आता फेसबुकवर 18 वर्षांखालील मुलांचे अर्ध-नग्न फोटो व्हायरल होणार नाहीत, ‘टेक इट डाउन’ होणार सुरू

Untitled Design   2023 04 11T131337.771

Take It Down Updates : आजकाल दिवसेंदिवस सोशल मीडियाचा (social media) वापर अधिक वाढत चालला आहे. अगदी लहान-सहान मुलं देखील मोबाईल फ्रेडली झाली आहेत. या मुलांचा फेसबुक(Facebook), इंस्टाग्राम (Instagram या सारख्या सोशल मीडीयाकडे अधिक कल असतो. मात्र, बऱ्याचदा ही मुलं ऑनलाईन फेंड बनवच्या प्रयत्नात फ्रॉडच्या जाळ्यात सापडतात. चॅटींग करतांना ते सेक्सॉर्टशनमध्ये अडकतात. त्याचेच नग्र फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी त्यांनी देण्यात येते. शिवाय, आजकाल काही विक्षिप्त लोक प्रेम प्रकरणातून महिलांचेही आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. परिणामी, या प्रकारामुळं अनेकांवर हकनाक जीव देण्याची वेळ येते. मात्र, आता याला आळा बसणार आहे. कारण, सोशल मीडिया कंपनी मेटाने (Meta)आपल्या युजर्ससाठी ‘टेक इट डाउन’ टूल लॉन्च केले आहे.

या उपकरणाच्या मदतीने प्लॅटफॉर्मवर नग्न फोटांना प्रसारित होण्यापासून रोखली जाईल. हे टूल नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रनद्वारे चालवले जाते. हे टूल सुरू करण्यामागचा उद्देश लैंगिक शोषणाची प्रकरणे कमी करणे आणि लोकांची गोपनीयता कायम राखणे हा आहे. दरम्यान, टेक इट डाउन नेमकं कसे कार्य करते? याच विषयी जाणून घेऊ.

जुने फोटो देखील ब्लॉक केले जातील
या टूलच्या मदतीने भूतकाळात अपलोड केलेले फोटोही प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले जाऊ शकतात आणि ते व्हायरल करण्यापासून रोखले जाऊ शकतात. आजकाल, नग्न फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने शेअर करून त्यामाध्यमातून लोकांना ब्लॅकमेल केले जाते. भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या खूप जास्त आहे आणि या लोकसंख्येतील काही टक्के लोक 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. मुलं सोशल मीडियाचा खूप वापर करतात आणि ते सहज कोणाच्याही जाळ्यात अडकतात आणि मग लोक याचा गैरफायदा फायदा घेतात. पण आता हे सगळं संपुष्टात येणार आहे. जर एखाद्या वापरकर्त्याने टेक इट डाउन टूलच्या मदतीने एखाद्या फोटोची तक्रार केली तर त्या फोटोची डिजिटल फिंगरप्रिंट तयार केली जाते ज्याला हॅश म्हणतात. एक प्रकारे, तुमचा फोटो कोडमध्ये बदलला जातो आणि नंतर तो कोणीही पाहू शकत नाही. या टूलची चांगली गोष्ट अशी आहे की एकदा फोटोची तक्रार दिल्यानंतर, प्लॅटफॉर्मवरील सर्व सारखे फोटो ओपन जाणार नाहीत. म्हणजे तो ब्लॉक केला जाईल. तसेच जर एखाद्या व्यक्तीने तो फोटो प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्याचा प्रयत्न केला तर तेही शक्य होणार नाही.

Uddhav Thackeray : “मस्तीत बोलणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी….” बाबरी पाडल्याचा मुद्यावरून ठाकरे संतापले

मेटा ने सांगितले की हे टूल भारतात या वर्षाच्या अखेरीस हिंदीमध्ये लॉन्च केले जाईल आणि आगामी काळात ते इतर प्रादेशिक भाषांमध्ये देखील दिसेल. दरम्यान, या टूलमध्ये एक पेच असा आहे की जर कोणी तुमचे नग्न चित्र सेव्ह केले आणि ते एडीट करून ते सोशल मीडियावर अपलोड केले, तर अशावेळी ही इमेज ब्लॉक केली जाणार नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube