Android फोन अजून स्मार्ट बनवा ‘या’ 7 ट्रिक्सने; जाणून घ्या सर्वकाही

Android Phones Best Features : देशात आज मोठ्या प्रमाणात अँड्रॉइड फोनचा वापर केला जात आहे. या फोनच्या मदतीने दररोज लाखो रुपयांचे आर्थिक

  • Written By: Published:
Android Phones Best Features

Android Phones Best Features : देशात आज मोठ्या प्रमाणात अँड्रॉइड फोनचा वापर केला जात आहे. या फोनच्या मदतीने दररोज लाखो रुपयांचे आर्थिक व्यवहार करण्यात येत आहे. तसेच घरी बसल्या बसल्या जेवण्याची आणि शॉपिंगची व्यवस्था करता येते मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? या अँड्रॉइड फोनमध्ये असे काही फीचर्स आहे ज्याबाबत तुम्हाला माहिती नसेल मात्र या फीचर्सच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन आणखी सुरक्षित बनवू शकतात. चला मग जाणून घ्या या भन्नाट फीचर्सबद्दल सर्वकाही.

डिजिटल वेलबीइंग आणि फोकस मोड

जर तुम्ही तुमच्या फोनमध्ये जास्त वेळ घालवत असेल तर डिजिटल वेलबीइंग आणि फोकस मोड फीचर्स तुमच्यासाठी सर्वात बेस्ट ठरु शकतात. डिजिटल वेलबीइंग तुम्हाला दिवसभरात तुम्ही किती वेळा आणि कोणते अ‍ॅप्स वापरले याबाबत सविस्तर माहिती सांगतो. तर फोकस मोड तुमचे लक्ष विचलित करणारे अ‍ॅप्स तात्पुरते ब्लॉक करतो. ज्यामुळे तुमचा जास्त लक्ष कामावर आणि अभ्यासावर होऊ शकतो.

स्प्लिट स्क्रीन मोड

जर तुम्ही तुमच्या फोनमध्ये एकाच वेळी दोन अ‍ॅप्सचा वापर करुन काम करणार असाल तर स्प्लिट स्क्रीन मोड हे फीचर्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. हे फीचर्स तुम्हाला एकाच वेळी दोन अ‍ॅप्स वापरण्याची परवानगी देते. ज्यामुळे तुम्ही एकाच वेळी YouTube आणि Whatsapp वापरु शकतात. स्प्लिट स्क्रीन मोड चालू करण्यासाठी, ‘अलीकडील ‘ अ‍ॅप्स’ बटण दाबा आणि अ‍ॅप्सवर ‘स्प्लिट स्क्रीन’ निवडा.

स्क्रीन पिनिंग

कधी कधी काही कामामुळे आपल्याला आपले फोन मित्र किंवा कुटुंबातील व्यक्तीसोबत शेअर करावा लागतो त्यावेळी तुम्हाला स्क्रीन पिनिंग फीचर्स फायदेशीर ठरु शकतो. जर तुम्ही इतरांना काही फोटो दाखवण्यासाठी तुमचा फोन दिला तर या फीचर्सच्या मदतीने तुम्हाला फोनमधील इतर अ‍ॅप्स लॉक करता येते आणि जेव्हापर्यंत तुम्ही ते अ‍ॅप्स अनलॉक करत नाही तेव्हापर्यंत ते अ‍ॅप्स लॉक असतात. हे फीचर्स फोनमध्ये ‘सेटिंग्ज > सुरक्षा > स्क्रीन पिनिंग’ मध्ये आढळते.

व्हॉइस अ‍ॅक्सेस / व्हॉइस कंट्रोल

व्हॉइस अ‍ॅक्सेस फीचर्स तुम्हाला व्हॉइस कमांडद्वारे तुमचा फोन पूर्णपणे नियंत्रित करण्याची परवानगी देते. तुम्ही ‘यूट्यूब ओपन करा’ किंवा ‘खाली स्क्रोल करा’ सारख्या कमांड वापरू शकता. हे फीचर्स विशेषतः टचस्क्रीन वापरण्यास अडचण येणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे.

क्विक टॅप जेश्चर (बॅक टॅप)

नवीन अँड्रॉइड व्हर्जनमध्ये ‘क्विक टॅप’ फीचर्स समाविष्ट आहे जे तुम्हाला स्क्रीनशॉट घेणे, कॅमेरा ओपन किंवा गुगल असिस्टंट सक्रिय करणे यासारख्या क्रिया करण्यासाठी तुमच्या फोनच्या मागील बाजूस डबल-टॅप करण्याची परवानगी देते. हे ‘सेटिंग्ज > सिस्टम > जेश्चर > क्विक टॅप’ वर जाऊन सेट केले जाऊ शकते.

संजय राऊतजी…, कट्टर विरोधक नितेश राणेंची राऊतांसाठी भावूक पोस्ट

नेअरबाय शेअर

हे अँड्रॉइडचे स्वतःचे ‘एअरड्रॉप’ सारखे फीचर्स आहे. तुम्ही इंटरनेटशिवाय देखील जवळपासच्या अँड्रॉइड डिव्हाइसवर फोटो, व्हिडिओ किंवा फाइल्स त्वरित पाठवू शकता. हे फायली शेअर करण्याचा एक जलद, सुरक्षित आणि सोपा मार्ग आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

follow us