टोयोटाची सर्वात महागडी कार अखेर भारतात लाॅन्च

टोयोटाची सर्वात महागडी कार अखेर भारतात लाॅन्च

नवी दिल्ली : ऑटो एक्स्पो 2023 मध्ये, ऑटोमॅकर टोयोटाने भारतात स्वतःची एक नवीन कार सादर केली आहे. तिला टोयोटा लँड क्रूझर 300 म्हटले जात आहे, जी भारतात आतापर्यंत सर्वात महागडी कार असल्याचा दावा केला जात आहे. विश्वसनीय इंजिनामुळे ही कार सेलिब्रिटी आणि राजकारण्यांमध्ये नेहमीच लोकप्रिय आहे. या SUVकारला नेहमीच जास्त मागणी असते त्यामुळे तिचा बुकिंग कालावधीही जास्त दिसतो.

ही कार बुक करण्यासाठी ग्राहकांना 10 लाख रुपये मोजावे लागतील. त्याच वेळी, त्याची किंमत 2.17 कोटी रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यात देण्यात आलेल्या वैशिष्ट्यांमुळे, त्याची पहिली बुकिंग पूर्णपणे झाली आहे. लवकरच दुसऱ्या बॅचसाठी बुकिंग सुरू होण्याची अपेक्षा आहे.

वैशिष्ट्ये :
टोयोटा लँड क्रूझर 300 ग्राहकांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानापासून ते केबिनच्या आरामापर्यंत सर्व काही देते. या कारमध्ये कंपनीने 12.3-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम दिली आहे, जी अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले या दोन्हींना सपोर्ट करते. या कारमध्ये 4 झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, मूनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, मल्टिपल यूएसबी चार्जिंग पोर्ट, वायरलेस चार्जिंग आणि 14 अनेक सुविधा आहेत. या कारमध्ये स्पीकर JBL प्रीमियम ऑडिओ सिस्टीमसह इतर उत्कृष्ट वैशिष्ट्ये पाहता येतील.

इंजिन :
या टोयोटा एसयूव्हीमध्ये कंपनीने 3.3-लिटर ट्विट-टर्बो डिझेल इंजिन दिले आहे, जे 10-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते. इंजिन 305hp पॉवर आणि 700Nm टॉर्क जनरेट करते. टोयोटा लँड क्रूझर 200 आणि टोयोटा लँड क्रूझर 300 चा मागील भाग सारखा दिसतो.

किंमत जाणून घ्या :
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय बाजारपेठेत ही टोयोटा कार खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना 10 लाख रुपये बुकिंग रक्कम भरावी लागेल. भारतात या कारची किंमत 2 कोटी 17 लाख रुपये (एक्स-शोरूम किंमत) आहे. मात्र, या एसयूव्हीच्या पुढील बॅचचे बुकिंग कधी सुरू होईल, हे कंपनीने अद्याप स्पष्ट केलेले नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube