युरिक अॅसिडच्या समस्येवर हळद ठरते प्रभावी
मुंबई : उच्च युरिक अॅसिडची समस्या सध्या अनेकांना सतावत आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. युरिक अॅसिडमुळे किडनीच्या समस्या आणि हात-पायांच्या सांध्यामध्ये वेदना होऊ लागतात. शरीरातील युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्याने पायाला सूज येऊ लागते. याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हळद खूप प्रभावी आहे.
हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबायोटिक मोठ्या प्रमाणात आढळतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हळदीमध्ये कर्क्यूमिन देखील आढळते जे जळजळ कमी करण्याचे काम करते. यूरिक अॅसिड नियंत्रित करण्यासाठी, हळदीचे दूध पिण्याचा सल्ला दिला जातो.
या घरगुती उपायांनी यूरिक अॅसिडड नियंत्रित करा
ज्यांना युरिक अॅसिडची समस्या आहे त्यांनी भरपूर पाणी प्यावे. पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ आणि युरिक अॅसिड फिल्टर केले जातात.
गोड आणि साखरेचा समावेश असलेल्या खाद्यपदार्थांपासून अंतर ठेवावे. यातील फ्रुक्टोजमुळे यूरिक अॅसिड आणि मधुमेह वाढू शकतो.
ग्रीन टी प्यायल्याने युरिक अॅसिडही कमी होते. तसेच हिरव्या भाज्या आणि बीन्स युरिक अॅसिडच्या समस्येवर औषधाप्रमाणे काम करतात.
उच्च फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने देखील यूरिक अॅसिड कमी होते. ओट्स, सफरचंद, पेरू यांचा आहारात समावेश करावा. तसेच व्हिटॅमिन सी साठी संत्रा, लिंबू आणि बेरी यांचा आहारात समावेश करावा.