बाईकवरून पडताच हेल्मेटमधून बाहेर येणार एअरबॅग? व्हायरल व्हिडिओचं सत्य समोर
Helmet With Full Body Airbag बाइकवरून पडताच हेल्मेटमधून बाहेर येणार फुल बॉडी एअरबॅग? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य आलं समोर...
Viral Video Helmet With Full Body Airbag : आजकाल सोशल मीडियावर दररोज नवनवीन आणि अंगावर काटा आणणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर आगीप्रमाणे पसरत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की, चीनने एक असा चमत्कारिक हेलमेट तयार केला आहे, जो बाईकस्वाराला अपघात होताच संपूर्ण शरीराला एका मोठ्या एअरबॅगमध्ये झाकून घेतो. ऐकायला एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटातील टेक्नॉलॉजी वाटते ना? मात्र, या व्हिडिओमागचं सत्य काहीतरी वेगळंच आहे. हा खरोखर चीनचा नवीन शोध आहे की, AI ने तयार केलेली आणखी एक भन्नाट कल्पना? व्हायरल व्हिडिओमागचं संपूर्ण सत्य समजून घेऊया….
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची सुरुवात एका बाईक रायडरच्या रस्त्यावर पडण्याने होते. जसा रायडर बाईकवरून घसरून खाली पडतो, तसं डोळ्यांच्या पापण्या लपकत नाही तोच त्याच्या हेलमेटमधून एक विशाल एअरबॅग बाहेर पडते आणि त्याच्या संपूर्ण शरीराला चहूबाजूंनी सुरक्षित वेढा घालते. व्हिडिओच्या शेवटी धोका टळल्यानंतर ही एअरबॅग आपोआप आकुंचन पावते. दिसायला हा विजुअल इफेक्ट अत्यंत शानदार आणि एखाद्या हॉलीवुडच्या सायन्स-फिक्शन चित्रपटासारखा वाटतो, ज्यामुळे लोक विचार न करता तो मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत.
एवढेच नव्हे तर, ऑनलाइन चर्चांमध्ये या करिष्मॅटिक हेलमेटचे श्रेय चीनच्या ‘Lanxi Yema Motorcycle Fittings’ आणि ‘Yanfeng Automotive’ या दोन कंपन्यांना दिलं जात आहे. ‘Lanxi Yema’ ही चीनमधील झेजियांग प्रांतातील मोठी हेलमेट उत्पादक कंपनी आहे, तर ‘Yanfeng’ ही गाड्यांसाठी एअरबॅग आणि सीटबेल्ट बनवणारी कंपनी आहे. मात्र, या दोन्ही कंपन्यांच्या अधिकृत वेबसाईट किंवा पोर्टफोलिओमध्ये अशा फुल-बॉडी एअरबॅग हेल्मेटचा ठोस पुरावा आढळलेला नाही. म्हणजेच सोशल मीडियावर सांगितली जाणारी ही गोष्ट सध्या तरी सिद्ध झालेली नाही.
वरील सर्व मुद्दे समजून घेतल्यानंतर हा व्हिडिओ AI ने तयार केला आहे का? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. रायडरने घातलेला लेदर सूट देखील इटलीच्या ‘Dainese’ या लक्झरी ब्रँडचा आहे. एखादी चिनी कंपनी आपल्या नव्या प्रॉडक्टच्या प्रमोशनमध्ये इटालियन ब्रँड्सचे लोगो वापरणार नाही. व्हिडिओमध्ये ज्या चिनी कंपनीच्या हेल्मेटचा दावा केला जात आहे, तिची ब्रँडिंगच दिसत नाहीये. याशिवाय या कथित प्रॉडक्टचे अधिकृत लॉन्चिंग, प्रमाणपत्र, स्वतंत्र सुरक्षा चाचणी किंवा अधिकृत प्रॉडक्ट डेमो यांचा ठोस पुरावा समोर आलेला नाही. त्यामुळे हा व्हिडिओ AI च्या मदतीने तयार केलेला असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.
व्हायरल व्हिडिओमधील फुल-बॉडी एअरबॅग हेल्मेटचा दावा संशयास्पद असला, तरी बाइक रायडर्ससाठी एअरबॅग टेक्नॉलॉजी ही काही काल्पनिक गोष्ट नाही. आज अनेक प्रोफेशनल बाइक रायडर्स आणि रेसर्स विशेष एअरबॅग जॅकेट किंवा एअरबॅग व्हेस्ट वापरतात.
A Chinese company testing out helmets with built in airbags!
Such a clever idea 👏 https://t.co/LEGR3UYnDV
— HOW THINGS WORK (@HowThingsWork_) November 17, 2026