वारली चित्रकला स्पर्धा योजना
LetsUpp | Govt.Schemes
ठाणे (Thane)जिल्हयातील वारली (Warli) या अनुसूचित जमातीच्या पारंपारिक भित्ती चित्रांना व त्यांच्या चित्रकलेस जगभर मान्यता मिळालेली आहे. या चित्रकलेचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रौढ गट व शालेय गट असे दोन करुन दरवर्षी स्पर्धा घेण्यात येतात व त्यातील गुणवत्तेनुसार येणाऱ्या पहिल्या 31 निवडक चित्रांना बक्षिसे (Award) दिली जातात.
योजनेच्या प्रमुख अटी : स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकास वारली चित्रकला येत असावी.
Pune : पुणे जिल्ह्यात होणार राजकीय भूकंप; खांदेपालटाची तयारी सुरु
आवश्यक कागदपत्रे : अधिवास दाखला, जमातीचा दाखला.
लाभाचे स्वरूप असे: प्रती लाभार्थी स्वरुप –
▪ प्रवासखर्च 50 /- रुपये.
▪ मानधन 170 /- रुपये.
▪20 बक्षिसे : 9030 /- रुपये.
या ठिकाणी संपर्क साधावा : संबंधित क्षेत्राचे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
📍 (टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)