Pune : पुणे जिल्ह्यात होणार राजकीय भूकंप; खांदेपालटाची तयारी सुरु

Pune :  पुणे जिल्ह्यात होणार राजकीय भूकंप; खांदेपालटाची तयारी सुरु

BJP Pune :  पुणे जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहराचे अध्यक्षपदी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. याचबरोबर पुणे जिल्ह्याध्यक्ष देखील नवीन नियुक्त केला जाऊ शकतो. भाजपच्या कसब्यामधील पराभवानंतर पुणे शहराचा अध्यक्ष बदलणार अशी चर्चा होती. त्यामुळे आता काही नवीन नावे देखील या पदासाठी चर्चेत आली आहेत.

सध्या जगदीश मुळीक हे पुणे शहराचे अध्यक्ष आहेत. पण कसब्यामधील पराभवानंतर त्यांची या पदावरुन गच्छंती होणार असल्याचे बोलले जात आहे. मुळीक यांच्या जागेवर पुणे शहराध्यक्ष पदासाठी मुरलीधर मोहोळ, सिद्धार्थ शिरोळे, गणेश बिडकर, धीरज घाटे या भाजप नेत्यांची नावं चर्चेत आहेत.

Rescue Operation : वारजेकरांनी सोडला सुटकेचा निश्वास; धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

याचबरोबर पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष पदासाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे भाऊ शंकर जगताप यांचे नाव चर्चेत आहे. याठिकाणी भाजपने पोटनिवडणुकीत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा भाजपकडून शंकर जगताप यांचे नाव देखील उमेदवारीसाठी चर्चेत होते. तसेच यावेळी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिल्याने शंकर जगताप हे नाराज झाल्याचे देखील बोलले जात होते. त्यामुळे त्यांना आता पक्ष नवी जबाबदारी देण्याच्या तयारीत दिसतो आहे.

पुण्यातील प्रवाशांच्या जीवांची किंमत शून्य?, पीएमपी चालकाचा चित्रपट पाहत वाहन चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल

तसेच भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी आशा बुचके, राहुल कुल, शरद बुट्टे, धर्मेंद्र खांडरे यांची नवे चर्चेत आहेत. याचबरोबर जिल्ह्यात देखील नव्या कार्यकारणीत अनेकांना संधी मिळण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने भाजप हा बदल करु शकतो. नवीन चेहऱ्यांना संधी देऊन महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्याचा विचार भाजपचा आहे, असे बोलले जात आहे.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube