पोखरा अंतर्गत गोड्या पाण्यातील मत्स्य पालन योजना आहे तरी काय?

पोखरा अंतर्गत गोड्या पाण्यातील मत्स्य पालन योजना आहे तरी काय?

Government Schemes : देशातील शेती (agriculture)हा प्रमुख व्यवसाय आहे. भारताची अर्थव्यवस्था (Economy of India)ही शेतीवर अवलंबून आहे. ग्रामीण भागातील जवळजवळ शंभर टक्के अर्थकारण (economy)शेतीवर अवलंबून आहे. या शेती व्यवसायाला आता शेतकरी विविध प्रकारच्या जोडधंद्याची सांगड घालून शेती व्यवसाय फायदेशीर बनवीत आहेत. या प्रमुख जोडधंद्यांमध्ये पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन (Fisheries)आदी व्यवसायांचा समावेश आहे.

काँग्रेसला मोठा धक्का : कार्यकारी अध्यक्षाचा तीन आमदारांसह भाजपच्या सरकाराला थेट पाठिंबा

योजनेचे उद्दिष्ट :
– पोखरा योजनेंतर्गत प्रकल्पामध्ये समाविष्ट केलेल्या गाव समूहातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे जी काही परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सर्वतोपरी सक्षम बनवण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे.
– संरक्षित सिंचनासोबतच जोडधंदा म्हणून गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. उपलब्ध नैसर्गिक साधनांचा प्रत्यक्ष उत्पादनासाठी कार्यक्षमपणे वापर करुन मच्छी शेती विकसित करणे आणि शेतकऱ्यांची रोजगार वाढवणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

South Korean Company : मूल जन्माला घाला अन् मिळवा 62 लाख; कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली खास ऑफर

योजनेसाठी पात्रता काय?
– या योजनेंतर्गत निवड केलेल्या गाव पातळीच्या ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेले,अत्यल्प व अल्पभूधारक शेतकरी, अनुसूचित जाती आणि जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकऱ्यांना प्राधान्यक्रमाने निवड करुन लाभ देण्यात येतो.
– सिंचनासाठी सामुदायिक शेततळे किंवा वैयक्तिक शेततळे उपलब्ध आहे,अशा शेतकऱ्यांना लाभ देण्यात येतो.
– ज्या शेतकऱ्यांनी अगोदर मत्स्य शेती अंतर्गत घटकाचा कोणत्याही योजनांच्या माध्यमातून लाभ घेतला नसेल अशाच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
-लाभार्थी शेतकऱ्याकडे किमान आठ ते दहा महिने टिकेल इतका पाण्याचा साठा असावा.
– मत्स्यपालन तलाव हा शक्यतो आयताकृती असावा. त्यामुळे मासे पकडण्यासाठी जाळी फिरवणे सोयीचे जाते.
– मत्स्यपालन तलावाची खोली किमान 1.2 मीटर ते दोन मीटर असणे आवश्यक आहे.

अनुदान कसे मिळणार?
– लाभार्थींनी ऑनलाइन अनुदान मागणी उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे करावी. मत्स्यबीज खाद्य व खाते आदी निविष्ठांची खरेदी देयकांच्या मूळ प्रति अपलोड करावे लागतात. त्यानंतर अनुदान थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यात जमा केले जाते.
– मत्स्य पालनाबद्दल लाभार्थ्यांसाठी प्रशिक्षण शासकीय खर्चाने केले जाते.

किती अर्थसहाय्य मिळेल?
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प गावातील अल्प किंवा अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी 75 टक्के अर्थसहाय्य या योजनेंतर्गत दिले जाते.
– 2 ते 5 हेक्‍टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी 65 टक्के अर्थसाहाय्य दिले जाते.

आवश्यक कागदपत्रे
– जमिनीचा सातबारा उतारा
– आठ अ प्रमाणपत्र (उतारा)

या ठिकाणी करा अर्ज :
– या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी https//dbt.mahapocra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी अर्ज करुन आवश्यक कागदपत्रं अपलोड करावी.

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

follow us
  • fb
  • instagram
  • youtube