मराठवाडा विभागात समाधानकारक पाऊस, विभागात ३४ लाख ५९ हजार हेक्टरवर झाली पेरणी

Chhatrapati Sambhajinagar : कायम दुष्काळजन्य परिस्थिती असलेल्या मराठवाड्यात अनेकदा अवकाळी किंवा मोसमात झालेल्या पावसामुळे नुकसानच वाट्याला येत. यंदा मात्र, समोतोल राहिल अशी काही प्रमाणात परिस्थिती आहे. (Sambhajinagar) आज रविवार, (दि. २९ जून)पर्यंत ६९.५७ टक्के पेरणी झालीआहे.
सर्वसाधारण ४९ लाख ७२ हजार ७२८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात ३४ लाख ५९ हजार ३५५ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. ही पेरणी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ६९.५७ टक्के इतकी आहे. पेरणी करताना शेतकऱ्यांनी १७ लाख ९४ हजार ६२४ हेक्टर क्षेत्रात सोयाबीन तर ९ लाख ५८ हजार ९७० हेक्टर क्षेत्रावर कपाशी लागवडीला प्राधान्य दिलं आहे.
लातूर कृषी विभागातील लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यात सर्वसाधारण वीस लाख तीस हजार ७०४ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १९ लाख २९ हजार ५६३ हेक्टर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ६८.१७ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. या विभागातील शेतकऱ्यांनी कपाशीच्या सर्वसाधारण ४ लाख ४४ हजार ७८७ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत तीन लाख सहा हजार ७१२ हेक्टरवर कपाशीची लागवड केली.
अखेर बीडमधील त्या दोन शिक्षकांना अटक, विद्यार्थिनींचा केबिनमध्ये करत होते लैंगिक छळ
छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील जालना, बीड व छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यात सर्व साधारण २१ लाख ४२ हजार २३ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १५ लाख २९ हजार ७९१ हेक्टर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७१.४२ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. यामध्ये ६ लाख ५२ हजार २५८ हक्क क्षेत्रावर कपाशी तर चार लाख ३१ हजार ५८६ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणीला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे.
त्यासोबतच सोयाबीनच्या सर्वसाधारण १७ लाख ८६ हजार १२७ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १३ लाख ६३ हजार ३८ हेक्टर वर सोयाबीनची पेरणी केली आहे. मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, हे जिल्हे प्रामुख्याने सोयाबीन उत्पादक तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी हे कापूस उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जातात.
मराठवाड्यात उडीद मुगाचे क्षेत्र मात्र घटत असल्याची स्थिती आहे. यंदा मराठवाड्यात मुगाचं सर्वसाधारण एक लाख २२ हजार १५३ हेक्टर क्षेत्र आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात ६०९६२ हेक्टरवरच म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ४९.९१ टक्केच पेरणी झाली आहे. दुसरीकडे उडदाचे क्षेत्र १ लाख ४४ हजार ४३१ हेक्टर असताना प्रत्यक्षात ८९ हजार ४८५ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ६१.९६ टक्के क्षेत्रावरच उडीदाची पेरणी झाली आहे.