Muhurat Trading 2023: मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय? त्याचे महत्त्व काय असते?
Diwali Muhurta Trading 2023: यंदा दिवाळीच्या शुभमुहूर्तावर (Diwali Muhurta Trading) शेअर बाजारात (Share Market) मुहूर्ताच्या खरेदी- विक्रीची वेळ निश्चित करण्यात आली. यामुळे आता गुंतवणूकदारांचं लक्ष शुभ मुहूर्ताच्या ट्रेडिंगकडं असणार आहे. ही मुहूर्त ट्रेडिंग (Muhurat Trading) नावाची संकल्पना नेमकी काय आहे? याचे नेमकं महत्व काय? ही परंपरा कधीपासून सुरू झाली आणि यंदाची वेळेचा मुहूर्त काय असणार आहे? सुट्टीमुळे कोणत्या दिवशी व्यवसाय बंद राहणार? या सर्व गोष्टीबद्दल जाणून घेणं महत्वाचं ठरणार आहे.
सर्वसाधारणपणे दिवाळीचे काही दिवस शेअर बाजारातील व्यवहार बंद राहत असते. त्याला कारण देखील असतो मुहूर्ताच्या ट्रेडिंगचा. एकीकडं देशभरात लोक दिवाळा साजरी करत असताना आणि फटाक्यांची आतिषबाजी करत असताना एक वर्ग मुहूर्ताच्या ट्रेडिंगमध्ये व्यस्त असल्याचे बघायला मिळत असते. यंदा हा मुहूर्त रविवार, 12 नोव्हेंबर दिवशीचा असणार आहे.
मुहूर्त ट्रेडिंग हा नावाप्रमाणे ट्रेड किंवा व्यापार विश्वाशी संबंधित असणार आहे. दिवाळीतील लक्ष्मीपूजनानं व्यापार्यांच्या नवीन वर्षाची सुरुवात होत असते. या दिवशी व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात येत असते. कारण हा दिवस शुभ मानलं जात नाही. यामुळे या दिवशी सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून ट्रेडिंगचा शुभ मुहूर्त असणार आहे.
शेअर मार्केटचा या मुहूर्तावर व्यापार म्हणजेच, शेअरची खरेदी केली जात असते. दिवाळीच्या मुहूर्तावर पैसे गुंतवणं खूपच शुभ असतं. या खरेदीमुळं आर्थिक भरभराट होत असते आणि भरभरून यश मिळतं असे मानलं जातं असते. गेल्या 5 वर्षांचा इतिहास पाहिलं तर मुहूर्ताच्या ट्रेडिंगला शेअर बाजारामध्ये सतत वधारून बंद झाला आहे. यंदा दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नेमकं काय होतं याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Parineeti Chopra: राघव चड्ढाच्या वाढदिवसानिमित्त परिणीतीची खास पोस्ट; म्हणाली, देवाने मला…’
मुहूर्ताच्या ट्रेडिंगला मोठ्या प्रमाणात मोठी खरेदी होत नाही. ही एक प्रतिकात्मक परंपरा मानली जात आहे. परंतु, गुंतवणूकदार या दिवशी काही शेअर खरेदी करत असतात. या दिवशीची विक्री थोड्याफार प्रमाणात केली जात असते. नफा- तोट्याचा विचार न करता हा मुहूर्त शुभ मानला जात असतो.
यंदाचा नेमका मुहूर्त काय असणार?
मुहूर्त ट्रेडिंगसाठी शेअर बाजार रविवारी, 12 नोव्हेंबर दिवशी सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 7.15 वाजेपर्यंत खुला असणार आहे. ब्लॉक डीलची विंडो मार्केट सुरू होण्याच्या 15 मिनिटे अगोदर म्हणजेच सायंकाळी 5 वाजून 45 वाजता उघडण्यात येणार आहे. मार्केटची वेळ सायंकाळी 6.15 ते 7.15 पर्यंत असणार आहे आणि मोडिफिकेशन्स सायंकाळी 7.25 पर्यंत करता येणार आहे. आणि क्लोजिंग सेशन सायंकाळी 7.25 ते 7.35 या वेळेत असणार आहे.
15 नोव्हेंबरपासून पुन्हा नियमित ट्रेडिंग
दिवाळीच्या मुहूर्तावर रविवारी मुहूर्ताची खरेदी- विक्री असणार आहे. मंगळवार 14 नोव्हेंबर दिवशी दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं शेअर बाजारामधील व्यवहार बंद राहणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 15 नोव्हेंबर दिवशी कामकाज पुन्हा नियमित सुरू होणार आहे.