चैत्र प्रतिप्रदेला का असत मराठी नववर्ष अन् का उभारली जाते गुढी? जाणून घ्या विविध अख्यायिका

Why Marathi New Year celebrated on Chaitra Pratiprada and why is Gudhi erected: जगभरात जानेवारीमध्ये नवीन वर्ष साजरा केला जात असल्या तरी देखील आपलं मराठी नववर्ष मात्र चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याला सुरू होता आणि याच नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याच्या अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात.चला तर जाणून घेऊ कोणत्या आहे त्या कथा?
अजय गोगावले आणि आनंदी जोशीच्या सुमधुर स्वरात ‘आता थांबायचं नाय’ चं शीर्षगीत प्रेक्षकांच्या भेटीला
याच मंगलदिनी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि पुढे “सत्य-युगाची” सुरुवात झाली. याच दिवशी शक सुरु करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा शालिवाहन राजाने शालिवाहन शक या कालगणनेची सुरूवात केली. कारण याच दिवशी शालिवाहन राजाने शत्रुंचा पराभव करू विजय मिळवला या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शक सुरु करून नवीन वर्षाची सुरुवात केली गेली.
चाकूने सपासप भोसकले…सातारच्या गौरीला बंगळुरूत संपवलं, पतीकडून क्रूर हत्या
तर गुढी उभारण्याचं कारण म्हणजे याच चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले होते. तर याच दिवशी प्रभू श्रीराम चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्येला परतले होते. त्यामुळे प्रजेने त्यांचे स्वागत आणि आपला आनंद गुढी उभारून केले होते. तर नवं वर्ष सुरू होत असल्याने या दिवशी पंचागाचे पुजन आणि वाचन करून देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे.
खंडणीचा उल्लेखच नाही….जयराम चाटे आणि महेश केदारच्या जबाबात वेगळंच
तसेच याच दिवशी नववर्षाची सुरूवात करण्यासाठी जुन्या वाईट आठवणी मनातील अढ्या काढून नव्याकडे वाटचालीस शुभेच्छा दिल्या जातात. तसेच गूळ आणि कडूलिंबाच्या चुर्णाचे सेवन केले जाते. हे देखील सरत्या वर्षाच्या कडू आठवणी गिळून घेऊन गोड आठवणींचा गोडवा जीभेवर रेंगाळत राहो याच शुभेच्छा असतात. तर याच काळात ऋतू बदलामुळे विविध आजार उद्भवू शकतात. मात्र आयुर्वेदात सांगितल्या प्रमाणे कडू लिंबाच्या आरोग्यदायी गुणांनी या आजारावर मात करण्यास प्रतिकार शक्ती मिळते. तसेच हा चैत्र पाडवा हा दिवस साडेतीन मुहुर्तापैकी एक मानला जातो. कारण या दिवशी अवकाशातील ग्रह आणि नक्षत्र अत्यंत अनुकूल स्थितीत असतात त्यामुळे हा दिवस शुभ कार्याची सुरूवात करण्यास किंवा नवीन वस्तू विशेषत: सोने आणि घर किंवा वाहन खरेदी करण्यास अत्यंत योग्य मानला जातो.
तर फक्त महाराष्ट्रातच नाही तर दक्षिण भारतात देखील हा सण युगादी म्हणून साजरा केला जातो. या शब्दामध्ये युग म्हणजे काळ आणि आदी म्हणजे सुरूवात म्हणजेच काळाची सुरूवात होय त्यामुळे मंडळी कशा वाटल्या आपलं नववर्ष आणि गुढी पाडव्याच्या वेगवेगळ्या पौराणिक अख्यायिका. तुम्हा सर्व प्रेक्षकांना हे वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावो याच गुढीपाडव्यानिमित्त लेट्सअप मराठीकडून हार्दिक शुभेच्छा.