सगळ्यांकडे छान-छान गाड्या मग दारिद्र्य रेषेखाली कसे? मर्सिडीजनंतर गोऱ्हेंच्या भाषणात शिवसैनिकांच्या गाड्या

सगळ्यांकडे छान-छान गाड्या मग दारिद्र्य रेषेखाली कसे? मर्सिडीजनंतर गोऱ्हेंच्या भाषणात शिवसैनिकांच्या गाड्या

Neelam Gorhe on Cars of Below poverty line Shivsainik after Mercedes Statement : शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पुण्यामध्ये शिवसेनेच्या शहर आणि जिल्हा संवाद बैठकीमध्ये शिवसैनिकांच्या गाड्यांवर भाष्य केले आहे. त्यामुळे गेल्यावेळी चर्चेत आलेल्या गोऱ्हेंच्या मर्सिडीजवरील वक्तव्यानंतर त्यांच्या भाषणात पुन्हा एकदा शिवसैनिकांच्या गाड्या आल्या आहेत.

म्यानमार, थायलंडमध्ये 7.7 रिश्टर स्केलचा भूकंप; इमारती कोसळल्या, बँकॉकमध्ये आणीबाणी

यावेळी बोलताना गोऱ्हे म्हणाल्या की, सगळे लाड करतात आणि मी थोडी शिस्त लावली की वाईट वाटतं. म्हणून मी आज काही बोलायचं नाही हेच ठरवलं होत. पण अनेक शिसैनिकांनी सांगितलं होतं की, सभासद मोहिमेमध्ये जास्तीत जास्त तयार करू. शाखा प्रमुख देखील अत्यंत कमी आहेत. मात्र ते देखील नसतील तर नेमले जावेत. बाळासाहेब मालुसरेंनी मला शब्द दिला आहे की, ते 100 शाखाप्रमुख तयार करतील त्यामुळे त्यांनी ते 50 तरी करावेत. तसेच शाखेचे बोर्ड लावले जावेत ते लावणं काही अवघड नाही. कारण पक्ष देखील त्यासाठी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही तेवढे दारिद्र्य रेषेखाली आहात असं देखील नाही सर्वांकडे छान छान गाड्या आहेत त्या असायलाच हव्यात. त्यामुळे एक पाटी लावायला हवी. असं म्हणत गोऱ्हेंनी शिवसैनिकांना कामगिरीवरून सुनावले आहे.

काय सांगता?..कोर्टात प्रवेश करताना कोल्हापुरी चप्पल घालण्यास बंदी?..वाचा नक्की काय आहे कारण

दरम्यान गेल्या वेळी चर्चेत आलेल्या गोऱ्हेंच्या मर्सिडीजवरील वक्तव्यानंतर त्यांच्या भाषणात पुन्हा एकदा शिवसैनिकांच्या गाड्या आल्या आहेत. त्यावेळी त्यांनी नवी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये. असे घडलो आम्ही या कार्यक्रमात बोलताना नीलम गोऱ्हे यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं होत. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, कार्यकर्त्यांना कमी समजण्याचं काहीच कारण नाही. नव्या मॅनेजरचा गल्ला गोळा करण्याचा प्रयत्न तेव्हापासून सुरू होता का असा प्रश्न गोऱ्हेंना विचारण्यात आला. यावर गोऱ्हे म्हणाल्या, कार्यकर्त्याला कमी समजण्याचे काहीच कारण नाही. प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसे यायची आणि त्यांचीच माणसे कार्यक्रमाचे नियोजन करत होते.

आता जास्त तपशीलात जाणार नाही. उद्धव ठाकरे गटाचे फार लोकही समोर नाहीत. त्यामुळे त्यांच्या गटाचे लोक येथे असते तर मला बोललेले अधिक आवडले असते. नेत्यांना संपर्क नको असेल तर आपण तिथे नकोसे झालो आहोत असे समजावे. दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावर एक पद असे होते असा गौप्यस्फोट डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube