देशभरात आंबेडकर जयंतीचा उत्साह; नेते मंडळींकडून बाबासाहेबांना अभिवादन पाहा फोटो

- आज देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्साहाच वातावरण आहे. देशभरात सामान्यांसह नेतेमंडळींकडून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं त्याचेच काही खास फोटो पाहुयात…
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त संसद भवन नवी दिल्ली येथे त्यांना अभिवादन केले
- यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बौद्ध भिक्खूंना देखी नमन केले.
- भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष एवं केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दिल्लीतील राष्ट्रीय स्मारक महापरिनिर्वाण येथे त्यांना अभिवादन केले.
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी, दादर येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मीळ छायाचित्रांचं प्रदर्शन आयोजित केले आहे.
- त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्यासमवेत महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रदर्शनाची पाहणी केली.