झोपता झोपता AI च्या मदतीने 1,000 नोकऱ्यांसाठी अर्ज अन् सकाळी घडलं असं काही …

  • Written By: Published:
झोपता झोपता AI च्या मदतीने 1,000 नोकऱ्यांसाठी अर्ज अन् सकाळी घडलं असं काही …

AI-artificial Intelligence : आज केवळ भारताच नाहीतर संपूर्ण जगात एआयचा (AI) वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. याबाबत अनेक बातम्या देखील समोर येत आहे. आजच्या या डिजिटल युगात एआयने कामाची संपुर्ण पध्दत बदलली आहे. आज एआय लोकांना नोकरी शोधण्यापासून ते नोकरीसाठी सीव्ही (CV) तयार करण्यासाठी मदत करते हे तुम्हाला माहिती आहे मात्र एका व्यक्तीने झोपता झोपता तब्बल एक हजार नोकऱ्यांसाठी अर्ज केला आणि सकाळी त्याला धक्का बसला.

माहितीनुसार, एका व्यक्तीने एआयचा वापर करून एका रात्रीत 1000 नोकऱ्यांसाठी अर्ज केला होता आणि सकाळी त्याला यापैकी 50 हून अधिक कंपन्यांकडून मुलाखतीचे कॉल आले होते.

रेडिटच्या ‘गेट एम्प्लॉयड’ फोरमवर स्टोरी शेअर करताना त्या माणसाने सांगितले की, त्याने स्वतः तयार केलेल्या एआय बॉटचा वापर केला. हा बॉट उमेदवारांच्या माहितीचे विश्लेषण करतो, नोकरीची डिटेल्स तपासतो आणि त्यानुसार उमेदवाराचा सीव्ही आणि कव्हर लेटर तयार करतो आणि कंपनीच्या प्रश्नांची उत्तरे देऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करतो.

या व्यक्तीने सांगितले की, मी झोपी गेलो आणि त्यानंतर माझ्यासाठी बॉट रात्रभर काम करत होता आणि या प्रक्रियेमुळे मला एका महिन्यात सुमारे 50 मुलाखतीचे कॉल येण्यास मदत झाली. असं त्या व्यक्तीने रेडिटवर सांगितले आहे.

एआय वापरून नोकरीसाठी अर्ज

या व्यक्तीचा एआय बॉट पूर्णपणे ऑटोमॅटिक असून तो नोकरीच्या वर्णनावर आधारित कस्टमाइज्ड सीव्ही आणि कव्हर लेटर तयार करतो. या व्यक्तीने लिहिले आहे की, प्रत्येक नोकरीसाठी कस्टमाइज्ड अर्जामुळे माझे प्रोफाइल अधिक आकर्षक बनले आणि माझ्या निवड प्रक्रियेत मला मदत झाली. या स्टोरीवर एका व्यक्तीने लिहिले की, ही पद्धत अत्यंत प्रभावी असली तरी, ती व्यावसायिक संबंधांच्या स्वरूपाबद्दल प्रश्न उपस्थित करते. नोकरी अर्ज प्रक्रियेत मानवी शक्ती गमावण्याचा धोका देखील असतो आणि याचा कामाच्या ठिकाणी फार मोठा फरक पडतो.

कुटुंब न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर पण प्रशासनाला लाज वाटत नाही, संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्योती मेटे आक्रमक 

तर दुसरीकडे ही घटना फक्त आजच्या काळात एआयचे वाढते महत्व अधोरेखित करत नाही तर तंत्रज्ञानाने नोकरी शोध प्रक्रियेत कशी क्रांती घडवून आणली आहे. याबाबत देखील माहिती देते. मात्र यामुळे कामाच्या ठिकाणी काय फरक पडणार याबाबत देखील सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या