युट्यूब शॉर्टमधून देखील तुम्ही कमावू शकता पैसे, युट्यूबकडून नवी घोषणा

  • Written By: Published:
युट्यूब शॉर्टमधून देखील तुम्ही कमावू शकता पैसे, युट्यूबकडून नवी घोषणा

पुणे : सोशल मीडियावर वेगवेगळया प्रकारचा कंटेंट तयार करुन पैसे कमावणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही. अशाच लोकांसाठी युट्यूबकडून एक नवीन संधी उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत युट्यूबवरील फक्त मोठे व्हीडीओ मॉनिटाइज होत होते.

पण आता लवकरच युट्यूबवर शॉर्ट सुद्धा मॉनिटाइज होणार आहेत. येत्या १ फेब्रुवारीपासून युट्यूब शॉर्ट मॉनिटाइज होणार आहेत. तशी घोषणा युट्यूब कडून केली आहे.

सध्या यूट्यूब चॅनल मॉनिटाइज होण्यासाठी यूट्यूब पार्टनर प्रोग्रॅमचा सदस्य असावं लागतं. त्याचं सदस्य बनण्यासाठी तुमच्या चॅनलवर १००० सबस्क्रायबर्स आणि गेल्या बारा महिन्यात तुमचे 4000+ तास वॉचटाईम असावा लागतो.

पण युट्यूब शॉर्ट मॉनिटाइज होण्यासाठी १००० सबस्क्रायबर्स, बारा महिन्यात तुमचे 4000+ तास वॉचटाईम सोबत शॉर्ट व्हिडिओना एक कोटी व्ह्यूज पूर्ण झालेले असले पाहिजेत. तरच तुम्हाला शॉर्टमधून पैसे कमावता येतील.

यशिवाय युट्यूबकडून Creator Music नावाचा नवा ऑप्शन उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ज्यामुळे यूट्यूबवर व्हिडिओसोबत लावण्यासाठी गाणी आणि संगीत उपलब्ध करून दिलं जाईल ज्यामुळ क्रिएटर आणि संगीतकार दोघांनाही उत्पन्न मिळेल. यामध्ये जास्त लांबीच्या व्हिडिओमध्ये वापरण्यासाठी गाणी विकत घेता येतील आणि मग हव्या तेवढया वेळा वापरता येतील जेणेकरून कॉपीराइट स्ट्राइकची भीती राहणार नाही.

ज्यांना संगीत विकत घ्यायचं नाही त्यांना त्या व्हिडिओमार्फत आलेल्या उत्पन्नामधून त्या संगीत तयार करणाऱ्या व्यक्ति/कंपनीसोबत त्यांचं उत्पन्न वाटून घ्यावं लागेल. याची सुरुवात अमेरिकेत २०२३ पासून करण्यात येणार

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube