Twitter : तुम्हाला आवडलेले ट्विट सेव्ह करून ठेवता येणार, ट्विटरचं नवीन अपडेट

  • Written By: Published:
elon musk twitter_LetsUpp

सोशल मिडीया हा आता आपल्या रोजच्या जगण्याचा भाग आहे. त्यामुळे सर्वच सोशल मीडिया कंपन्या सतत काहीतरी नवीन अपडेट देत असतात. मागच्या काही दिवसात ट्विटरकडून ( Twitter) अनेक नवीन अपडेट युझर्ससाठी दिले आहेत. त्यात आता आणखी एका फीचर्सची भर पडणार आहे.

एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून त्यांनी ऍप मध्ये अनेक नवीन बदल केले आहेत. पेड ब्लू बॅचपासून (Twitter Blue Tick), यलो आणि ग्रे व्हेरिफिकेशन टिक मार्क सोबत बरीच नवीन अपडेट मागच्या काही दिवसात ट्विटरमध्ये आली. आता ट्विटरने आणखी एक नवं फिचर आणलं आहे. हे नवं फीचर आहे “बुकमार्क”. या नव्या फिचरमुळे तुम्हाला एखाद्याचे ट्विट आवडले तर तुम्हाला ते सेव्ह म्हणजे बुकमार्क कडून ठेवता येणार आहे.

बुकमार्क फीचरमुळे स्क्रोलिंग करत असताना तुम्हाला जर एखाद ट्विट आवडलं तर तुम्ही ते नंतर वाचण्यासाठी किंवा कायमस्वरूपी माहितीसाठी सेव्ह करून ठेवू शकणार आहेत. सध्या हे फिचर फक्त आयओएस युजर्ससाठी आहे. पण लवकरच ते बाकी युजर्सना देखील वापरता येईल.

दोन दिवसापूर्वी एलॉन मस्क यांनी ट्विट करत सांगितले की, आता ट्विटरचे युझर्स त्यांचे आवडते ट्विट बुकमार्क म्हणून सेव्ह करू शकतील. महत्वाचे म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्याचे ट्विट सेव्ह कराल तेव्हा ते पूर्णपणे खाजगी राहील. म्हणजेच तुम्ही कोणते ट्विट बुकमार्क केले आहे हे इतर कोणीही पाहू शकणार नाही. पण तुम्ही जे ट्विट बुकमार्क म्हणून सेव्ह कराल, ज्या व्यक्तीने ते ट्विट केले आहे, त्याचे ट्विट किती लोकांनी सेव्ह केले आहे, हे त्या व्यक्तीला दिसणार आहे.”

Tags

follow us