तुमच्यात साखर कारखाना चालवण्याची धमक नाही… सांगलीत विशाल पाटलांवर अजित पवारांचा घणाघात  

तुमच्यात साखर कारखाना चालवण्याची धमक नाही… सांगलीत विशाल पाटलांवर अजित पवारांचा घणाघात  

Ajit Pawar On Vishal Patil : राज्यात आता लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार होत आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीकडून (mahayuti) मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक जाहीर सभांचं आयोजन देखील करण्यात येत आहे.

आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगली मतदारसंघातून (Sangli Constituency) महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील (Sanjay Kaka Patil) यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत अजित पवार यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांच्यावर जोरदार टीका केली. तुमच्यात साखर कारखाना चालवण्याची धमक नाही आणि तुम्हाला खासदार व्हायचं आहे अशा शब्दात अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना टोला लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी संपूर्ण जगात भारताला एक वेगळी ओळख दिली, मोदी यांच्या काळात भारत अर्थव्यवस्थेमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. आता लवकरच आपण तिसऱ्या क्रमांकावर जाणार असल्याचं देखील या सभेत अजित पवार म्हणाले. याच बरोबर राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरु केले आहे. महायुती सरकार शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून लाईट बिल भरते येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी आणखी विकासकामे महायुती सरकारकडून होणार असल्याचं देखील ते म्हणाले.

सांगली मतदारसंघात यावेळी महायुतीकडून विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांच्या नावाची घोषणा केली आहे मात्र या जागेसाठी विशाल पाटील काँग्रेसकडून इच्छुक असल्याने सध्या या जागेची सर्वात जास्त चर्चा होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमधील घटकपक्ष काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये तिढा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे जागावाटपामध्ये ही जागा ठाकरे गटाला देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी काँग्रेसला सांगलीची जागा सुटावी यासाठी अनेक प्रत्यन करत होते मात्र ठाकरे गटाकडून या जागेवर चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यामुळे आता विशाल पाटील यांनी सांगली मतदारसंघातून अपक्ष आणि काँग्रेसकडून अर्ज भरला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज