शिंदेंच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत श्रीकांत शिंदेंचे नावच नाही; हेमंत गोडसेंचा पत्ता कट?

शिंदेंच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत श्रीकांत शिंदेंचे नावच नाही; हेमंत गोडसेंचा पत्ता कट?

Eknath Shinde Shiv Sena First Candidate List : लोकसभा निवडणुकीत आज शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची पहिली यादी ( Eknath Shinde Shiv Sena First Candidate List ) जाहीर झाली. या यादीत जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र विशेष म्हणजे या यादीमध्ये शिंदेचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेंचेच नाव नसल्याचं दिसत आहे. तसेच नाशिकच्या हेमंत गोडसेंचा देखील पहिल्या यादीतून पत्ता कट झाला आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधान आले आहे.

The Sabarmati Report चा टीझर आऊट! विक्रांत मॅसी अन् राशी खन्नाची जोडी मोठ्या पडद्यावर

या यादीत शिंदेचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि हेमंत गोडसेंचे नाव नसल्याने कल्याणची जागा भाजप मिळण्यासाठी भाजपचे नेते प्रयत्नशील असल्याचं बोललं जात आहे. तर इकडे नाशिकमधून छगन भुजबळांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जाण्याची शक्यता आहे. तसेच नाशिकच्या जागेवर भाजप देखील आग्रही आहे. त्यामुळेच शिंदेंच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत श्रीकांत शिंदेंचे नाव नाही. तसेच नाशिकच्या हेमंत गोडसेंचा देखील पहिल्या यादीतून पत्ता कट झाला आहे. असे बोलले जात आहे.

CM शिंदेंच्या शिवसेनेचे आठ उमेदवार जाहीर; खासदार तुमानेंचा पत्ता कट, कोल्हापुरात पुन्हा मंडलिकच

नाशिकबाबत सांगायचं झालं तर गेल्या अनेक दिवसांपासून या मतदारसंघांबाबत चर्चा सुरु होती. शिवसेनेकडून देखील या मतदारसंघावर दावा सांगितला जात होता. काही दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदे हे नाशिकमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी भर कार्यक्रमात हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. पण त्यावरुन भाजपमध्ये नाराजी परसल्याचं वृत्त समोर आलं होतं. या सर्व घडामोडींनंतर आज शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली. या यादीत गोडसेंचे नाव नाही त्यामुळे ही जागा शिंदे गटाकडे नसल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच नाव न नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे गेल्या 10 वर्षांपासून खासदार आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघ हा भाजप मिळावा अशी मागणी स्थानिक पदाधिकारी करत आहेत. त्यामुळेच श्रीकांत यांची उमेदवारी जाहीर झाली नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज