सुप्रिया सुळेंना 35 लाखांचा तर अजित पवारांना दिलंय 63 लाखांचा कर्ज, सुनेत्रा पवार यांची एकूण संपत्ती किती?

सुप्रिया सुळेंना 35 लाखांचा तर अजित पवारांना दिलंय 63 लाखांचा कर्ज, सुनेत्रा पवार यांची एकूण संपत्ती किती?

Sunetra Pawar Wealth : सध्या राज्यातील 48 लोकसभा जागांपैकी सर्वात जास्त चर्चा बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) जागेची होत आहे. या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) बारामती मतदारसंघात नणंद-भावजयी अशी लढत होणार आहे. शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आज सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जासोबत त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केला आहे. त्यांनी या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे असणाऱ्या एकूण संपत्तीची माहिती दिली.

या प्रतिज्ञापत्रानुसार, सुनेत्रा पवार यांना वैयक्तिक देणी कर्ज एकूण 12 कोटी 11 लाख 12 हजार 374 रुपये आहे तर येणी कर्ज 2 कोटी 31 लाख 2 हजार 181 आहे. यामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना 63 लाख 20 हजार 303 रुपये तर प्रतिभा पवार (Pratibha Pawar) यांना 50 लाख रुपये दिले आहे.

आर्थिक उत्पन्न

प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, 2022-23 मध्ये सुनेत्रा पवार यांचे आर्थिक उत्पन्न 4 कोटी 22 लाख 21 हजार 010 रुपये होता तर त्यांच्याकडे 12 कोटी 56 लाख 58 हजार 983 रुपये इतकी जंगम मालमत्ता आहे तर 58 कोटी 39 लाख 40 हजार 751 रुपये इतकी स्थावर मालमत्ता आहे.

सुनेत्रा पवार यांनी शेअर बाजारात देखील गुंतवणूक केली आहे. त्यांनी 15 लाख 69 हजार 610 रुपयांची शेअर बाजार आणि बॉन्डमध्ये गुंतवणूक केली आहे. तर स्व संपादित मालमत्ता 18 कोटी 11 लाख 72 हजार 185 रुपये आणि बँक खात्यातील एकणू ठेवी 2 कोटी 97 लाख 76 हजार 180 आहे.

सुनेत्रा पवार यांच्याकडे 57 लाख 76 हजार 877 रुपयांचे बचत पत्रे आहेत. त्यांनी 2 कोटी 31 लाख 2 हजार 181 रुपयांचं कर्ज दिलंय. तर त्यांच्याकडे 10 लाख 70 हजार रुपयांचे वाहने, ट्रॅक्टर आणि दोन ट्रेलर आहेत.

शरद पवारांकडून शिवसेनेला संपवण्याचे अनेक प्रयत्न, शिंदे गटाचा गंभीर आरोप

सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे 34 लाख 39 हजार 569 रुपयांचे डाग दागिणे आहे तसेच त्यांच्याकडे 6 कोटी 5 लाख 18 हजार 116 रुपये इतकी इतर मालमत्ता आहे. याच बरोबर त्यांनी 35 लाखांचं कर्ज सुप्रिया सुळे यांना दिलं असल्याची माहिती सुनेत्रा पवार यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज