समृद्धी महामार्गावर मृत्यूचा थरार! भरधाव ट्रकची भीषण धडक; सात कामगारांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर

मुंबईच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी प्रचंड होती की, कामगारांच्या गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला.

  • Written By: Published:
Untitled Design 14

7 people died in a terrible accident : समृद्धी महामार्गावर आज संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि हृदयदावक अपघात घडला आहे. मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने महामार्गाची सफाई करणाऱ्या कामगारांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत सात कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून, आणखी तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जालना जिल्ह्यातील जामनेर-कडवंची परिसरात हा अपघात घडला असून, संपूर्ण भागात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ जालना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कामगार समृद्धी महामार्गावर सफाईचे काम करत होते. काम आटोपल्यानंतर ते त्यांच्या गाडीत बसले असताना, महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या या वाहनाला मुंबईच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी प्रचंड होती की, कामगारांच्या गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला.

IND vs ZIM : IPL नंतर ‘या’ संघाशी भिडणार भारतीय संघ, जुलैमध्ये करणार दौरा; वेळापत्रक जाहीर

दरम्यान, गेल्या महिनाभरात समृद्धी महामार्गावरील हा दुसरा मोठा अपघात आहे. यापूर्वी 6 मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर जुळ्यातील कारमाडजवळ अशाच प्रकारच्या अपघातात तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे महामार्गावरील कामगारांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्या पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, अपघातातील ट्रक चालकाला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या अपघातामुळे काही काळ मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. वारंवार घडणाऱ्या अशा अपघातांमुळे समृद्धी महामार्गावरील ओव्हरस्पीडिंग आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी असलेल्या नियमांच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

follow us