सिंधुदुर्गमध्ये समुद्रात 8 पर्यटक बुडाले! तिघांचे मृतदेह सापडले, शोध सुरू
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर समुद्रकिनाऱ्यावर मोठा अपघात झाला.

8 tourists drown in Velagar Sea : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर समुद्रकिनाऱ्यावर मोठा अपघात झाला. आठ जण पोहत होते. तेव्हा ते सर्वजण समुद्राच्या लाटांमध्ये अडकले. यामध्ये तीन पर्यटकांचा मृत्यू झाला असून, तिघांना वाचवण्यात यश आले आहे. अजूनही दोनजण बेपत्ता असून, त्यांचा शोध स्थानिक प्रशासन व बचाव पथकाकडून सुरू आहे.
तिघांना वाचवण्यात यश
प्राथमिक माहितीनुसार, बुडालेल्यांमध्ये काही पर्यटक (tourists drown in Velagar Sea) कुडाळ येथील, तर काही बेळगावमधील आहेत. समुद्रात बुडालेल्या तिघांना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले (Sindhudurg) आहे. घटनास्थळी पोलिस व स्थानिक ग्रामस्थ मदत कार्यात गुंतले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मळगाव येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आणखी एक दुर्दैवी घटना घडली. महामार्ग ओलांडणाऱ्या सांबराला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली, यात ते गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी तत्काळ वन विभागाला माहिती दिली. मात्र, पथक पोहोचण्याआधीच त्या सांबराचा मृत्यू झाला.
वाहनांच्या धडकांचा सामना
जिल्ह्यातील बेसुमार जंगलतोडीमुळे अनेकदा वन्य प्राणी जंगलाबाहेर पडत आहेत. अन्न-पाण्याच्या शोधात रस्त्यावर येणाऱ्या या प्राण्यांना अनेकदा वाहनांच्या धडकांचा सामना करावा लागत आहे. मळगाव येथील ही घटना त्याचाच भाग असल्याचे स्पष्ट होत आहे.