गणपतीपुळेच्या समुद्रात संभाजीनगरचे 8 पर्यटक बुडाले, तिघांना वाचण्यात यश तर 5 जण अद्याप बेपत्ता
तिघांना वाचवण्यात बचावपथकाला यश आले असून पाच तरुण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाडे यांनी दिली.
8 tourists from Sambhajinagar drowned in the sea : रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन येथील तरुणांच्या गटावर दुर्दैवी संकट कोसळले आहे. समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्याने 19 जणांच्या गटातील काही तरुण समुद्रात ओढले गेले. या घटनेत 5 तरुणांचा बुडून मृत्यू झाला असून 3 जणांना बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिडकीन आणि परिसरातील 19 तरुण तीन दिवसांच्या सहलीसाठी रत्नागिरी येथे गेले होते. गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर फिरत असताना काही तरुण पोहण्यासाठी समुद्रात उतरले. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने आणि समुद्राच्या प्रवाहाचा वेग वाढल्याने ते अचानक खोल पाण्यात ओढले गेले. हा प्रकार लक्षात येताच त्यांच्या मित्रांनी आरडाओरड करत मदतीसाठी धाव घेतली.
ठाकरे गट सोडणार की नाही? ओमराजेंच्या नव्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा वाढला सस्पेन्स
या दुर्घटनेत आदित्य संतोष राऊत (22), अनिकेत बंडू हिवराळे (20), आनंद राजू नरवडे (20), प्रेम दीपक आदमाने (19) आणि यश रामेश्वर कांबळे या पाच तरुणांचा मृत्यू झाला. तर तिघा तरुणांना बचाव पथकाने वेळीच बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले.
घटनेची माहिती मिळताच रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाडे यांनी तातडीने गणपतीपुळे येथे धाव घेतली. त्यांनी स्वतः बचाव आणि शोधमोहीमेत सहभाग घेतला. समुद्रात बेपत्ता झालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले.
दरम्यान, या दुर्घटनेची बातमी बिडकीन गावात पोहोचताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. अवघ्या 18 ते 22 वयोगटातील तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सहलीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या मित्रांच्या गटावर आलेल्या या दुःखद प्रसंगाने संपूर्ण परिसर हळहळला आहे.