महाविकास आघाडीत फुट? प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

महाविकास आघाडीत फुट? प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

महाविकास आघाडीत फुट पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलंय. राष्ट्रवादीत बरंच काही घडायचं असून आणखी दोन बॉम्ब फुटणार असल्याचं दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

सिद्धरामय्या मुख्यमंत्री : शिवकुमारांचं खच्चीकरण की काँग्रेसची राजकीय खेळी?

आंबेडकर म्हणाले, यापूर्वीच काँग्रेस मुंबई महापालिक निवडणुका आम्ही स्वतंत्र लढणार असल्याचं नाना पटोलेंनी स्पष्ट केलं होतं. आता यापुढेही आणखी बरंच काही घडणार आहे. तसेच दोन बॉम्ब फुटणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

तसेच दोन बॉम्ब फुटल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण स्थिर होणार आहेत. त्याआधी महाविकास आघाडीमध्ये नवीन समीकरणं उभी राहणार आहेत. त्यामुळे लोकांनी वेट अॅंड वॉचची भूमिका घ्यावी, असंही ते म्हणाले आहेत. राष्ट्रवादीत बरंच काही घडायचंय, आणखी दोन बॉम्ब फुटायचे बाकी असल्याचं ते म्हणाले आहेत.

Santosh Dagde: माउंट एव्हरेस्टवर झळकले कर्जतचे नाव

याआधी प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडी फुटण्यास सुरुवात झाली असल्याचं म्हटलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढील काळात आणखी घटना घडणार आहेत. तिथं काय होतं ते पाहुनच काही पक्ष भूमिका घेणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्येही धुसफूस सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर अजित पवार आणि शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन या चर्चांना पूर्णविराम दिला होता. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनी हा दावा केला आहे.

दरम्यान, कर्नाटक निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातही निवडणुकीचे वारे वाहु लागले आहेत. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेत निवडणुकीची रणनीती आखली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. देशात भाजपचा पराभव करण्यासाठी विविध राज्यांतील विरोधी पक्षांकडून मोट बांधण्याच काम सुरु आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube