… तर पश्चातापाच्या गोष्टी मनात येतात, शिंदे – ठाकरेंनी चर्चा करावी; ठाण्यातील बैठकीनंतर नेमकं काय म्हणाले अब्दुल सत्तार ?
Abdul Sattar On Eknath Shinde : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना शिंदे
Abdul Sattar On Eknath Shinde : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी याबाबत प्रतिक्रिया देत पुन्हा एकदा दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत विचार करावे असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि छत्रपती संभाजीनगरमधील आमदारांची ठाण्यात बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. अब्दुल सत्तार यांना महायुतीचे नियम पाळण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच सत्तारांच्या नाराजीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत चर्चा करणार असं देखील यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे जे बोलतील तो अंतिम शब्द असेल असं अब्दुल सत्तार म्हणाले.
माध्यामांशी बोलताना अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले की, मोठ्या भावाकडून आमचा पक्ष संपवू पाहत आहे. जिल्ह्यात आमच्याबाबत अनेक घडामोडी घडत आहेत, निधी मिळत नाही. येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमचं काय होईल हाही प्रश्न आहे. सोबत येऊन जर का अशी वागणूक मिळत असेल तर पश्चातापाच्या गोष्टी मनात येतात. नाराजी होती, म्हणून हे पाऊल उचलले. 2029 पर्यंत आमच्या नेत्यांनी वेळीच या गोष्टीची दखल घेतली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याची दखल घेतलेली आहे. पक्षातही काही नाराजी होती त्यावर देखील सूचना शिंदेंनी दिल्या आहेत असं माध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले. तसेच विधान परिषद निवडणूक महायुती म्हणून लढायची अशा सूचना देखील एकनाथ शिंदे यांनी दिल्या असून त्याचं पालन मी करीन असं देखील यावेळी अब्दुल सत्तार म्हणाले.
पुढे बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, संभाजीनगरात आमचे सहा आमदार आणि एक खासदार आहे. भाजपचे तीन आमदार आहेत. असं असून देखील आम्ही त्यांना सत्तेमध्ये वरची बाजू दिली आहे कारण आम्ही महायुतीचा धर्म पाळतोय. आत्तापासून जर भाजप असं वागत असेल तर 2029 च्या निवडणुकांमध्ये युती राहणार का? यासंदर्भात चर्चा करावी लागेल असेही यावेळी अब्दुल सत्तार म्हणाले.
तसेच आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे. त्यांच्या सांगण्यानूसार आम्ही बाहेर पडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आमचे योग्य कामं बघून भाजपने त्याचंही मूल्यमापन करावं असे देखील यावेळी अब्दुल सत्तार म्हणाले.
भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर प्राजक्त तनपुरे पुन्हा चर्चेत; किती आहे त्यांची एकूण संपत्ती?
दोन्ही पक्ष प्रमुखांनी चर्चा करावी
तर शिवसेना एकत्र येण्यासाठी दोन्ही बाजूंच्या पक्ष प्रमुखांनी चर्चा करावी असं आवाहन देखील माध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी केलं. तसेच आमच्या पक्षातील साध्यात साधे बदल एकनाथ शिंदे करतील. आजच्या परिस्थितीमुळे आम्ही बेचैन आहोत. सध्या कुठल्याच निवडणुका नाहीत मात्र या सगळ्या निवडणुकांमध्ये जे चित्र समोर आलं की, मोठा भाऊ लहान भावाकडून सगळी सत्ता काढून घेतोय असेही अब्दुल सत्तार म्हणाले.