भ्रष्ट माणसांच्या हातात…, प्रचार संपताच अभिनेत्री तेजस्विनी पंडितची पोस्ट व्हायरल

सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर अभिनेत्री भाष्य करते. अशातच आता अभिनेत्रीनं केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.

  • Written By: Published:
News Photo   2026 01 13T194822.249

राज्यातील 29 महानगरपालिकांचा आज प्रचार संपला. (Election) 15 जानेवारीला म्हणजे परवा मतदान होणार आहे. दरम्यानच्या काळात सर्वच पक्षाच्या नेत्यांनी जोरदार प्रचार केला आहे. आता काही अभिनेत्रींनीही आपली मत सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले आहेत. मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मतदारांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

तेजस्विनी कायम सोशल मीडियावर सक्रीय असते. सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर अभिनेत्री भाष्य करते. अशातच आता अभिनेत्रीनं केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. तेजस्विनी पंडितनं इन्स्टाग्रामवर ‘marathi.com’ या पेजने एक व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ अभिनेत्रीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर री-शेअर केलाय. हा व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीनं जनतेला आवाहन केलं आहे.

गौतम अदानी 10 वर्षांतच कसे मोठे होतात? राज ठाकरेंनी गौडबंगाल सांगितलं…

तेजस्विनी पंडितनं लिहिलं की, ‘आपल्या रोजच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे नगरसेवक असतात. म्हणूनच भ्रष्ट माणसांच्या हातात पालिका देऊ नका. सतर्क रहा. योग्य, सुज्ञ आणि सुशिक्षित उमेदवारांना निवडून द्या.’ असं म्हणत अभिनेत्रीनं जनतेला योग्य उमेदवारला मत देण्याचं आवाहन जनतेला केलं आहे. राज्यात महापालिकांच्या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल लागणार आहे.

२० वर्षांनंतर उद्धव ठाकरे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे राज ठाकरे यांची युती झाली असून मुंबईतील ९७ जागांवर ही आघाडी भाजपला थेट टक्कर देणार आहे. भाजप १३७ आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना ९० जागा लढवत आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे १४३ जागांवर उमेदवार असून, वंचितांच्या ६२ जागा आहेत. दरम्यान, तेजस्विनी पंडितच्या कामाबद्दल बोलायचं तर तिनं अनेक सिनेमांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. ‘येरे येरे पैसा ३’ या सिनेमात अभिनेत्री शेवटची दिसली होती.

Tejaswini Pandit Post

follow us