अखेर भाजपच्या कमळाला राष्ट्रवादीचं घड्याळ! बाजार समितीसाठी एकवटले…
भंडारा जिल्ह्यातील एकूण सहा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी काँग्रेसला डावलून राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपची युती झाली आहे.
काही दिवसांपासून जी चर्चा राज्यात सुरु होती ती अखेर खरी ठरलीयं. अखेर भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसची युती झालीय. ही युती झाल्याने भंडारा जिल्ह्यात महाविकास आघाडीला मोठा तडा जाणार असल्याचं बोललं जातंय.
Nagraj Manjule: सत्य घटनेवर आधारीत, नागराज मंजुळेंची ‘खाशाबा’ चित्रपटाची पहिली झलक!
येत्या 30 एप्रिल रोजी भंडारा जिल्ह्यातील एकूण 6 कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी मतदान पार पडणार आहे. बाजार समित्यांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच पक्षांकडून रस्सीखेच सुरु होती. अशातच आता राष्ट्रवादीविषयी राज्याच्या राजकारणात सुरु असलेली चर्चा खरी ठरली आहे.
भंडारा जिल्ह्यात बाजार समितीतच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांनी युती झाल्याची चर्चा आहे. या वृत्ताला भाजपचे नेते परिणय फुके यांनी दुजोरा दिला असून शेतकऱ्यांच्या भल्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपची युती करण्यात आली आहे. ही युती झाल्याने खूप मोठी गोष्ट झाली असं मला वाटत नसल्याचंही ते म्हणाले आहेत.
कोण संजय राऊत ? अजितदादांचा खोचक प्रश्न; मी कोणाचं नाव घेतलं नव्हतं; अंगाला का लागावं?
राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला डावलत ही युती केलीय. महाविकास आघाडीमध्ये काही दिवसांपूर्वीच धूसफुस सुरु असल्याची चर्चा होती. अखेर राज्यात काँग्रेसला रोखण्यासाठीच राष्ट्रवादीकडून ही रणनीती आखण्यात येत असल्याचं बोललं जातंय. मात्र, या युतीमुळे राज्यात महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.
DC vs KKR: अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा KKR वर रोमहर्षक विजय
या युतीनंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला आहे. नाना पटोले म्हणाले, राष्ट्रवादीने कोणाबरोबर जायचं? ते त्यांनी ठरवावं पण काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याने असे कृत्य केल्यास त्याच्यावर कारवाई करणार असल्याचा इशाराच त्यांनी दिला आहे.
दरम्यान, 30 एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीसाठी हे दोन पक्ष एकत्र आल्याने जिल्ह्यातली राजकीय समीरकरण बदलली आहेत. याचा परिणाम आगामी विधानसभा आणि लोकसभा निडवणुकीकवरही होणार असल्याची शक्यता वर्तवणयात आलीय, मात्र, भंडारा जिल्ह्यात ही युती झाल्याने महाविकास आघाडीला तडा गेला आहे, हा तडा तसाच राहतो की याचीच पुनरावृत्ती सर्वच ठिकाणी पाहायला मिळणार असे प्रश्न उपस्तित केले जात आहे