तब्बल 18 तासांनंतर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे

तब्बल 18 तासांनंतर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेट घेण्याच्या अश्वासनानंतर अखेर पुण्यातील अलका टॉकीज चौकात सुरू असलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचं आंदोलन मागे घेतलं आहे. तब्बल 18 तासांनंतर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचं हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.एमपीएससीने परीक्षा अभ्यासक्रम पद्धतीमध्ये केलेल्या बदलाच्या विरोधात पुण्यातील अलका टॉकीज चौकात एमपीएसी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते. हे विद्यार्थी आक्रमक झाले होते. त्यांनी शुक्रवारी, 13 जानेवारीच्या सकाळपासूनच चौकात ठाण म्हणून बसले होते.

या विद्यार्थ्यांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यातील अलका टॉकीज चौकात आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या या विद्यार्थ्यांना भेटणार आहेत. या विद्यार्थ्यांच्या 5 जणांच्या शिष्टमंडळाकडून ही भेट घेण्यात येणार आहे. तर यावेळी या विद्यार्थ्यांनी सांगितले की, हे आंदोलन स्थगित करण्यीात आले असले तरी त्याला पुर्णविराम देण्यात आलेला नाही. तर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आमच्या मागण्या आम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहोत.

आयोगाकडून परीक्षा अभ्यासक्रम पद्धतीमध्ये करण्यात आलेला बदल हा 2025 पासून लागू करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने होईल असे विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं.

आयोगाने नवीन वर्षात म्हणजेच 2023 मध्ये संपूर्ण अभ्यासक्रम बदलून नवीन अभ्यासक्रम लागू केला आहे. अचानक अभ्यासक्रम बदलल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार नाही. गेल्या काही वर्षापासून आम्ही याच पद्धतीने अभ्यास करतोय यामुळे 2025 पर्यंत तरी मागील पद्धतीने एमपीएससीचा अभ्यासक्रम त्याच पद्धतीने ठेवावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

याच मागणीसाठी पुण्यातील एमपीएससी करणारे विद्यार्थी आज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांची ही मागणी आयोग मान्य करणार का? आणि त्यात बदल होईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube