Video : कल्याणनंतर आता डोंबिवलीत घडला धक्कादायक प्रकार; परप्रांतीयांची मुजोरी सुरुच

  • Written By: Published:
Video : कल्याणनंतर आता डोंबिवलीत घडला धक्कादायक प्रकार; परप्रांतीयांची मुजोरी सुरुच

Dombivali Immigration Dispute : कल्याणनंतर आता पुन्हा एकदा परप्रांतीयांची मुजोरी वाढल्याची घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा जाब विचारणाऱ्या (Dispute ) मराठी कुटुंबाला परप्रांतीय दाम्पत्याने मारहाण केली. (Dombivali ) कल्याणजवळील आडीवली ढोकळी परिसरात हा प्रकार घडला असून, डोंबिवलीच्या मानपाडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

परप्रांतीयांकडून देशमुख कुटुंबाला मारहाण; कल्याणमध्ये वातावरण तापलं, प्रकरण काय?

घरासमोर खेळणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत शनिवारी (ता. २१) रात्री दहाच्या सुमारास उत्तम पांडेने अश्लील चाळे करीत गैरवर्तन केले होते. पीडित मुलीच्या वडिलांनी पांडेच्या घरी जाऊन याबाबत जाब विचारला होता. मात्र, पांडे याने मुलीच्या वडिलांशीच वाद घालत त्यांना मारहाण केली. हा प्रकार मुलीच्या आईला समजल्यानंतर तिनेही याबाबत विचारणा केली असता, पांडे याची पत्नी रिनाने मुलीची आई, आजीला मारहाण केली. या घटनेत पीडित मुलीचे वडील, आई, आजी जखमी आहेत. या घटनेनंतर परप्रांतीयांच्या मुजोरीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या