‘अवघ्या दोन मिनिटांत नुकसान पाहणी; आमच्या नुकसानीचा अंदाज कसा येणार?’ केंद्रीय पथकासमोर शेतकऱ्यांचा संताप

Ahilyanagar Crop Damage Inspection; नगर तालुक्यातील चास आणि निमगाव शिवर परिसरात केंद्रीय पथकाने शेतांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली.

Ahilyanagar Crop Damage Inspection

Ahilyanagar Crop Damage Inspection: अहिल्यानगर: पावसाने ओढ दिली, हातातोंडाशी आलेली पिके करपली आणि डोळ्यांदेखत शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले गेल्या चार महिन्यांपासून पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी केंद्राचे पथक अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल झाले. नगर तालुक्यातील चास आणि निमगाव शिवर परिसरात केंद्रीय पथकाने शेतांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. मात्र, ही पाहणी अवघ्या दोन मिनिटांत उरकली जात असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. दोन मिनिटांत पाहणी करून आमच्या नुकसानीचा अंदाज कसा येणार? मग आम्हाला भरपाई तरी कशी मिळणार? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

सायनी गुप्ताने ‘IFFSA साउथ एशियन स्क्रीन एक्सलन्स अवॉर्ड’ स्वीकारून आपला वाढदिवस साजरा केला

जिल्ह्यात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने ज्वारी, सोयाबीन, मूग यांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पेरणीपासून ते पीक उभे करण्यासाठी केलेला खर्चही निघण्याची आशा मावळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने चास आणि निमगाव शिवर परिसरात प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांकडून पिकांचे क्षेत्र, पिकांची स्थिती, पाण्याची उपलब्धता आणि शेतीसाठी झालेला खर्च याबाबत माहिती घेण्यात आली. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पाहणी करून त्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे. या पाहणीवेळी कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.मात्र केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर शेतकऱ्यांचा रोष उफाळून आला. शेतात प्रत्यक्ष किती नुकसान झाले पिकांची सद्यस्थिती काय आहे आणि शेतकऱ्यांवर किती आर्थिक संकट ओढवले आहे याची सविस्तर पाहणी होणे अपेक्षित असताना घाईघाईत पाहणी केल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. केवळ कागदोपत्री आकडेवारीच्या आधारे नाही तर प्रत्यक्ष बांधावर येऊन नुकसानीची तीव्रता लक्षात घ्यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली.

पुण्यातील जोशी पुलावरील आंदोलन भोवलं; विश्रामबाग पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

केंद्राच्या पाहणी दौऱ्याचे रूपांतर प्रत्यक्ष मदतीत होणार का, हा खरा सवाल

हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, आम्ही कर्ज काढून पिके उभी केली, मात्र पावसाने साथ सोडल्याने सर्व काही हातातून गेले. आता शासनाने केवळ पाहणीचा फार्स न करता प्रत्यक्ष नुकसान लक्षात घेऊन मदत द्यावी, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.

पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड; एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर मंगेश चिवटेंचा मोठा निर्णय

केंद्राच्या पथकाकडून आता कोणता अहवाल सादर होतो आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरात किती मदत पडते याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पाहणी झाली, नुकसानीची माहितीही घेतली. आता प्रश्न आहे तो प्रत्यक्ष मदतीचा. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना आश्वासनांपेक्षा आर्थिक मदतीची तातडीने गरज असून, केंद्राच्या पाहणी दौऱ्याचे रूपांतर प्रत्यक्ष मदतीत होणार का, हा खरा सवाल आहे.

follow us