विधानपरिषद बिनविरोध! धुळफेक बंद करा…छुपा पाठींब्यावरून रूपवतेंचा आघाडीवर हल्लाबोल

Utkarsha Rupwate : विधान परिषदेची निवडणुकीत बिनविरोध पॅटर्न महाराष्ट्रात राबवला जात आहे. 17 विधान परिषद जागांचा उमेदवारी माघारी घेण्याचा

Utkarsha Rupwate

Utkarsha Rupwate : विधान परिषदेची निवडणुकीत बिनविरोध पॅटर्न महाराष्ट्रात राबवला जात आहे. 17 विधान परिषद जागांचा उमेदवारी माघारी घेण्याचा शेवटच्या दिवशी 17 पैकी 8 जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतली. असे करून भाजपला मदत करण्याचे पूणपणे महाविकास आघाडीने काम केले असा आरोप करत वंचितच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी बोलताना रूपवते (Utkarsha Rupwate) म्हणाल्या, इतरांना भाजपची बी टीम म्हणतात काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार या पक्षांनी आणि नेत्यांनी भाजपची ए टीम म्हणून काम करण्याला सुरुवात केलेली आहे. महाविकास आघाडीने लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणे बंद करून सरळ ते भाजपला मदत करत आहे हे मान्य करावे अशा शब्दात उत्कर्षा रूपवते यांनी आघाडीवर जोरदार निशाणा साधला.

टीम इंडियात आता ‘सरपंच राज’! श्रेयस अय्यर टीम इंडियाचा15 वा टी-20 कर्णधार

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ विधानपरिषद निवडणुकीतून अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अहिल्यानगरमध्ये बाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुर यांच्या विरोधातील अपक्ष उमेदवार करण ससाणे, कमलेश गांधी यांनी माघार घेतली. त्यामुळे भाजपचे प्राजक्त तनपुरे (Prajkta Tanpure) यांची बिनविरोध निवड होण्यासाठी दत्तात्रय पानसरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेणे आवश्यक होते. परंतु त्यांनी स्वतः उमेदवारी अर्ज माघारी घेतला नव्हता. त्यांच्या प्रतिनिधीने उमेदवारी अर्ज माघार घेतला होता. त्याला पानसरे यांनी आक्षेप घेतला होता. त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार गोंधळ उडाला होता.

follow us