अहिल्यानगरच्या शासकीय मेडिकल कॉलेजचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामकरण; यंदापासून सुरू होणार कॉलेज

Punyashloka Ahilyadevi Holkar College राज्यात नव्याने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय मेडिकल कॉलेज, अहिल्यानगर' यंदापासून सुरू होत आहे.

Punyashloka Ahilyadevi Holkar College

Ahilyanagar’s Government Medical College named Punyashloka Ahilyadevi Holkar College start from this year : राज्यात नव्याने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय मेडिकल कॉलेज, अहिल्यानगर’ यंदापासून सुरू होत आहे. मागील वर्षी 6 मे 2025 रोजी अहिल्यादेवीचे जन्मस्थळ चौंडी (ता. जामखेड) येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मेडिकल कॉलेजची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी वर्षभरात महायुती सरकारने केली आहे.

‘सृजन द क्रिएशन’ संस्थेचा सहावा वर्धापन सोहळा! खुली विनोदी स्किट स्पर्धा घेण्यात येणार

त्यानंतर आणखी एक अहिल्यानगर जिल्ह्याच्या शीरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे अहिल्यानगरच्या शासकीय मेडिकल कॉलेजचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असं नामकरण करण्यात आलं आहे. ज्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थळ आहे. त्यांच्या महान कार्याचा आणखी गौरव करणारी ही गोष्ट असल्याच्या प्रतिक्रिया विविध स्तरावरून येत आहेत.

धक्कादायक! कोल्हापूरातही परतवाड्याची पुनरावृत्ती; मुस्लिम तरुणांकडून व्हिडिओ बनवून तरुणींचं ब्लॅकमेलिंग

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या कॉलेजची मागणी केली होती. तिची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी यंदापासूनच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सुरू होत असल्याची घोषणा सोमवारी (27 एप्रिल) केली. यामुळे नगरच्या सिव्हिल हॉस्पीटलमध्ये 100 विद्यार्थी संख्या आणि 430 बेडची क्षमता असलेले वैद्यकीय कॉलेज-रुग्णालय सुरू होत असून या कॉलेजची प्रवेश प्रक्रिया याचवर्षी 2026 पासून सुरू होत आहे.

follow us