धमकीनंतर अहमदनगर येथील औरंगजेब मदरशाला पोलिस संरक्षण

धमकीनंतर अहमदनगर येथील औरंगजेब मदरशाला पोलिस संरक्षण

Ahmednagar : गेल्या काही दिवसांपासून राज्यात धार्मिक तेढ निर्माण होणाऱ्या घटनांमध्ये वाढ होऊ लागल्या आहेत. यातच अहमदनगर शहरातील मुकुंदनगर भागात औरंगजेबाची पोस्टर झळकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर काही हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत औरंगजेबाची खुलताबाद येथे असलेली कबर हिंदुत्ववादी संघटनांकडून उखडून टाकण्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून भिंगारमधील आलमगीर येथील औरंगजेबाच्या मदरशाला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी नगर शहरातील मुकुंदनगर परिसरात एका कार्यक्रमात औरंगजेबाची पोस्टर झळकवण्यात आले होते. या घटनेचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. यामुळे नगर जिल्ह्यासह राज्यातील राजकारण चांगलेच पेटले. याची दखल थेट वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली. संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते.

Chandrasekhar Bawankule : सौरभ पिंपळकर हा BJP चा कार्यकर्ता, पण त्याने धमकी दिली नाही; बावनकुळेंचं मोठं विधान

त्याबद्दल चार आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांनी औरंगजेबाची खुलताबाद येथील कबर तोडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पोलिसांनी आलमगीर येथील मदरशालाही संरक्षण दिले आहे. दरम्यान भिंगारमधील आलमगीर परिसरात औरंगजेबाचे काही काळ वास्तव्य असलेले ठिकाण मदरसा म्हणून ओळखले जाते. याच ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी भिंगार पोलिसांकडून या मदरशाला संरक्षण पुरविण्यात आले आहे.

अजितदादांवर अन्याय झाला का? जयंत पाटलांनी एका वाक्यात स्पष्टपणे दिलं उत्तर

पोलिसांची नागरिकांना आवाहन

सोशल मीडियावर आलेल्या काही आक्षेपार्ह पोस्ट लक्षात घेऊन आलमगीर येथील मदरशाच्या ठिकाणी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी संरक्षण देण्यात आले. तसेच नागरिकांनी देखील अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील भिंगार कॅम्पचे सहायक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे यांनी केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube