Ahmednagar : नितेश राणेंच्या निषेधार्थ आज अहमदनगर महापालिका बंद

Ahmednagar : नितेश राणेंच्या निषेधार्थ आज अहमदनगर महापालिका बंद

Ahmednagar Municipal Corporation closed on Nitesh Rane Statement: अहमदनगरच्या बाजारपेठेत दुकानासमोर बॅरिकेड लावण्याच्या वादातून दोन व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या भांडणात एका गटाकडून चाकू हल्ला करण्यात आला. यामध्ये एक व्यापारी गंभीर जखमी झाला. या घटनेचे पडसाद उमटले आहेत. आज भाजपचे आमदार नितेश राणे यांनी वादात जखमी झालेल्या व्यापाऱ्याची भेट घेऊन विचारपूस केली आहे. त्यानंतर त्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यासह जिल्हा प्रशासनावर हल्लाबोल केला. त्याचबरोबर त्यांनी अहमदनगरच्या महापालिका आयुक्तांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होतं.

राणेंच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ आज बुधवारी अहमदनगर महापालिका बंदची हाक अहमदनगर महापालिका कामगार संघटनेने दिली आहे.राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करत अहमदनगर महापालिका कामगार संघटनेचे पदाधिकारी सायंकाळी महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना भेटले. त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

आज १९ एप्रिल सकाळी ११ वाजता गेटसभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला महापालिकेच्या सर्व कामगारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे व सचिव आनंदराव वायकर यांनी केले आहे. या सभेत संघटनेचे पदाधिकारी आपल्या भावना व्यक्त करणार आहेत. महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व सेवा आज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

नगरच्या आयुक्तांना मस्ती आली काय ? म्हणत राणेंची जीभ घसरली !

राणे यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. राणे यांची बोलताना मात्र जीभ घसरली होती. महानगरपालिकेच्या आयुक्तांना बोलताना मस्ती आली काय असे म्हणत असताना राणे यांनी आयुक्तांना शिवीगाळ केली होती.

Eknath Khadse : मोदी सरकार आणि शिंदे-फडणवीस सरकारवरचा नागरिकांचा विश्वास कमी होत चालला

व्यापाऱ्याची भेट घेतल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी छोटेखानी सभा घेत आमदार संग्राम जगताप यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. त्यावर आमदार जगतापांनी प्रत्युत्तरही दिलं. यावेळी राणे म्हणाले, इथला आमदार माझ्या नजरेला उभा थांबत नाही. माझ्या नादाला कोणी लागू नये, 2024 ला अहमदनगरमध्ये येऊन मी हिसका दाखवणार असल्याचं आमदार राणे यांनी आमदार संग्राम जगताप यांना इशारा दिला होता.

नगरमध्ये व्यापाऱ्यांना झालेल्या मारहाणीप्रकरणी आम्ही ताबडतोब पीडिताला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असून आरोपींवर तत्काळ कारवाईची भूमिका प्रशासनासमोर मांडली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. अशा घटना याआधीही वारंवार घडत होत्या. मध्यांतरी हे सर्व थांबलं होतं, मात्र, काही लोकांकडून अशा गोष्टी घडत असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube