धनगर समाजासाठी सरकारचा मोठा निर्णय; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

धनगर समाजासाठी सरकारचा मोठा निर्णय; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामंकित शाळेतील प्रवेश संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मागण्यांसह प्रलंबित विषयांबाबत आज बैठक पार पडली. बैठकीनंतर अजित पवार यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे.

नामंकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत ही योजना इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही लागू करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती पवारांनी दिली.

केरळमध्ये हायअलर्ट, शाळा बंद; देशाची काळजी वाढवणारा ‘निपाह’ किती धोकादायक?

इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना निवास, भोजन तसंच अन्य शैक्षणिक सवलती देणारी आधार योजना लागू करणं, ओबीसी विद्यार्थ्यांच्या 72 वसतिगृहांसाठी साहित्य खरेदी आणि वित्त व विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेच्या अटी व शर्ती शिथिल करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देखील बैठकीत देण्यात आल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

Pune News: गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे खून प्रकरणी आरोपी बाळासाहेब खेडकर याचा मृत्यू

इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देखील महानगरं, शहरं आणि जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेता आलं पाहिजे. त्यासाठी आदिवासी विकास विभागाची ‘स्वयंम’ योजना आणि सामाजिक न्याय विभागाची ‘स्वाधार’ योजनेच्या धर्तीवर ‘आधार’ योजना राबवण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात भत्त्याची रक्कम थेट हस्तांतरित करण्यात येईल, या योजनेसाठी विद्यार्थी संख्या निश्चित करून विभागानं सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचेही निर्देश अजित पवारांनी दिले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube