Pune News: गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे खून प्रकरणी आरोपी बाळासाहेब खेडकर याचा मृत्यू

  • Written By: Published:
Maharashtra Crime

Pune News: गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे खून प्रकरणी आरोपी बाळासाहेब खेडकर पुण्यातील येरवडा कारागृहात खेडकर शिक्षा भोगत होता. १० सप्टेंबर रोजी खेडकर याला अर्धांगवायू (पॅरलिसीस) झाला होता. (Pune Crime) ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी ससून रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. (Pune Police) उरुळी कांचन येथील गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांच्या खून प्रकरणातील आरोपी बाळासाहेब खेडेकरसह 10 जणांवर २०२१ मध्ये मोकका लावण्यात आला होता.

उरुळी कांचन येथील गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांच्यावर १८ जुलै २०२१ रोजी रात्री दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी तलवारीने वार केले होते. या मध्ये बाळासाहेब खेडेकर मुख्य आरोपी होता. मृत्यूची न्यायालयीन चौकशी सुरु असून पुढील तपास सुरू आहे.

बातमी अपडेट होत आहे… 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube