संतापजनक! शिर्डीला जाणाऱ्या विमानामध्ये एअर होस्टेसचा विनयभंग

संतापजनक! शिर्डीला जाणाऱ्या विमानामध्ये एअर होस्टेसचा विनयभंग

Air Hostess Molestation In Delhi To Shirdi Flight : विमानात एका मद्यधुंद प्रवाशाने एअर होस्टेसचा विनयभंग (Air Hostess Molestation) केल्याची घटना (फ्लाइट क्रमांक 6A 6403) घडली. दिल्लीहून शिर्डीला (Shirdi) येणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 2 मे रोजी दुपारी ही घटना 1.40 ते 4.10 वाजेच्या दरम्यान घडली आहे. यामुळे मोठी खळबळ (Ahilayanagar Crime) उडाली आहे.

राहाता पोलीस ठाण्यात शिर्डी विमानतळावर विमान उतरल्यानंतर इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी तक्रार दाखल केली. लष्करी जवान प्रवासी हा आरोपी असल्याचं तपासात उघड झालंय. तर आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात (Crime News) आल्याची माहिती मिळत आहे. पीडित एअर होस्टेस केरळमधील कोचीन येथील असल्याची माहिती राहाता पोलिसांनी दिली आहे. तर आरोपी संदीप सुमेर सिंग (राजस्थान) याने प्रवासादरम्यान एअर होस्टेसचा विनयभंग केला.

Pahalgam Attack : मोठी बातमी! पंजाबमध्ये 2 पाकिस्तानी हेर पकडले, धक्कादायक माहिती समोर…

आरोपीने प्रवासादरम्यान एअर होस्टेसला जाणीवपूर्वक दोनदा चुकीचा स्पर्श केला. तिला लज्जा उत्पन्न होईल, असं वर्तन केलं. यामुळे एअरहोस्टेस घाबरली. एअरहोस्टससोबत आरोपीने विमानात असभ्य वर्तन केले. याबाबत पीडितेने लेखी तक्रार नोंदवली आहे. इंडिगोचे कर्मचारी संतोष कोंडीबा चौरे यांनी तक्रार दाखल केली असून संदीप सिंगविरोधात भादंवि 354 (विनयभंग) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय.

पहलगाम हल्ल्यामागे कंदाहार विमान अपहरण प्रकरणातील मास्टरमाईंड? धक्कादायक अपडेट

पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार पेटारे या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे विमान प्रवासादरम्यान महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय. अशा घटना रोखण्यासाठी विमान कंपन्यांनी कठोर नियम अन् सुरक्षाव्यवस्था लागू करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत असल्याचं दिसतंय. या घटनेमुळे शिर्डीमध्ये तणावाचं वातावरण आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube