जरांगेंवर टेंडर्सवरून आरोप करणारे बारस्करच अडचणीत; मालमत्ता खरेदीत गैरव्यवहारांचा आरोप
Ajay Baraskar Manoj Jarange जरांगेंविरोधात आवाज उठवणारे अजय बारस्कर पुन्हा एकदा एका वेगळ्या विषयावरून चर्चेत आले आहेत.
Ajay Baraskar allegations on Jarange regarding tenders, now finds him in accused of irregularities in property purchases : मनोज जरांगे यांच्या विरोधात सातत्याने आवाज उठवणारे अजय बारस्कर हे आपल्या वक्तव्याने सातत्याने चर्चेत असतात, मात्र ते पुन्हा एकदा एका वेगळ्या विषयावरून चर्चेत आले आहेत. अजय बारस्कर यांनी नगर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर मालमत्ता खरेदी केलेली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर ती आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा खळबळजनक आरोप शेवाळे नामक तरुणाने केला आहे. बारस्कर यांची चौकशी करण्यात यावी. अशी तक्रार देखील शेवाळे यांनी पोलीस स्थानकात केली आहे.
अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार! 21 पैकी 9 जागा बिनविरोध, उर्वरित 12 जागांसाठी तिरंगी लढत
नाशिक येथील रहिवासी असलेले शेवाळे म्हणाले की, 2014 या वर्षी त्यांच्या नामनिर्देशन पत्रामध्ये असलेली संपत्ती व आजमध्ये मोठी तफावत आहे. नगर शहरात नागापूर या परिसरामध्ये त्यांचे स्थापन करण्यात आलेले कॉम्प्लेक्स देखील अनधिकृत आहे. दोन ते तीन तक्रारदारांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. इतरांचे सातबारे दाखवून बारस्करचे आरोप करताहेत त्यांचे देखील सातबारा यात बाहेर येणार.
रणबीर कपूरही होता बिश्नोई गँगच्या निशाण्यावर; घराची रेकी केल्याची माहिती
तसेच त्यांच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून? याबाबत आमचा आक्षेप असून काही दिवसांपूर्वी तुम्ही म्हणालात की, माझ्यावरती वीस लाखांचा कर्ज आहे. तर आता त्यांच्याकडे 20 कोटींची प्रॉपर्टी आहे. एवढी प्रॉपर्टी तुमच्याकडून आली कशी? याबाबत ईडीने चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. असे शेवाळे म्हणाले.
अजय बारस्कर हे कधीच म्हणून जरांगे यांचे सहकारी नव्हते. केवळ जरांगे पाटलांकडून बारस्कर यांचा जाहीर मंचावर झालेल्या अपमानाचा वैयक्तिक दोषातून हे खोटे नाते आरोप करत असल्याचा दावा यावेळी शेवाळ यांनी केला. तसेच बारस्कर यांनी 50 ते 60 कोटींचा घोटाळा केला तर देखील दावा शेवाळे यांनी केला.