अजित पवारांची मोठी घोषणा! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 10 हजारांची तातडीची मदत जाहीर

अजित पवारांची मोठी घोषणा! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 10 हजारांची तातडीची मदत जाहीर

Ajit Pawar on Flood : सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीने थैमान घातलं आहे. त्यामुळे शेतीच मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांचा याचा मोठा अर्थिक फटका बसला आहे. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने 10 हजारांची मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. (Ajit Pawar announce 10 thousand rupees as help for Farmers who damaged by Flood and Heavy rain)

नोकरभरतीच्या कठोर कायद्यासाठी स्पर्धा परीक्षा समिती करणार ‘ट्विटर वॉर’; वाचा सविस्तर

अजित पवार म्हणाले, 23 जुलैला राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. शेतीचं मोठं नुकसान झालं. त्या ठिकाणी मंत्र्यांनी भेटी दिल्या आहेत. तात्पुरती त्या लोकांना मदत देण्यात आली आहे. मात्र त्यांचं आर्थिक पुनर्वसन होणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी पूर आणि अतिवृष्टीने मृत्यू झाला असल्यास त्या मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रूपये तर ज्या घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यांना 10 हजार रूपये तातडिने देण्यात यावेत. असे आदेश पवारांनी दिले आहेत.

Ranveer Singh: ‘रॉकी और रानी…’ सिनेमातील रणवीरच्या हॉट-डॅशिंग लूकचा Video Viral

दरम्यान अजित पवार म्हणाले की, राज्यसरकार नुकसानग्रस्तांच्या पाठिशी आहे. यामध्ये यवतमाळ, बुलढाणा, वाशिम येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तेथे लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. त्यासाठी वायुदलाची मदत घेण्यात आली होती. त्यामुळे पूराने रस्ते बंद झाले असलो तरी बचाव कार्य करता आले. तसेच एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यांची देखील मदत घेण्यात आली. अशी माहिती अजिप पवार यांनी दिली.

तसेच विदर्भ आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाने थैमान घातलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मागील 48 तासात संपूर्ण कोल्हापुरात मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या पावसामुळे पंचगंगा नदी ओसंडून वाहत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube