Ajit Pawar अन्य राज्ये येऊन गुंतवणूक पळवून नेतात… मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गल्ली बोळात फिरतात

Ajit Pawar अन्य राज्ये येऊन गुंतवणूक पळवून नेतात… मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गल्ली बोळात फिरतात

मुंबई : गेले आठ महिने राज्यात अभूतपूर्व राजकीय, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, प्रशासकीय अराजकता आहे. राज्याला पूर्ण मंत्रिमंडळ नाही. मुख्यमंत्री मंत्रालयाऐवजी, बाहेरंच जास्त फिरतात. प्रशासन ठप्प आहे. राजकीय अस्थितरतेचा विकासप्रक्रियेवर परिणाम होत आहे. मंत्री, सत्तारुढ पक्षाचे नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्ये, वर्तनाने राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडत आहे. उद्योग, व्यापार राज्याबाहेर चालले आहेत. गुजरात, उत्तर प्रदेशसारखी अन्य राज्ये महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक पळवून नेत जात आहेत, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर केला.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या, राजन साळवी, वैभव नाईक यांच्यासारख्या नेत्यांना एसीबीच्या नोटीसी आल्या आहेत. हसन मुश्रीफ यांच्यावरही छापे टाकण्यात आले. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर छापे टाकण्याचं एकमेव काम, या सरकारकडे उरलं आहे. निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थांची स्वायत्तता टिकली पाहिजे. त्यांच्याबद्दलचा आदर कायम राहिला पाहिजे. तो टिकवण्याची जबाबदारी संबंधीत संस्थांचीही आहे.

Ajit Pawar : माजी मंत्र्यांला अंडरवर्ल्ड मार्फत संपविण्याची भाषा… तरीही ‘ईडी’ सरकार सुस्त!

राज्यात सुरु असलेले तसेच गुंतवणुकीची शंभर टक्के खात्री असलेले अनेक उद्योग, प्रकल्प गेल्या आठ महिन्यांत राज्याबाहेर पळवण्यात आले. अनेक व्यापारी कार्यालयं राज्याबाहेर गेली. त्यातून राज्याची आर्थिक हानी झाली. लाखो तरुणांचे रोजगार बुडाले, असा देखील आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावेळी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube