विरोधकांकडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न; अजितदादांचा शरद पवार, उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

विरोधकांकडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न; अजितदादांचा शरद पवार, उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

Ajit Pawar On Sharad Pawar : जालन्यातील घटनेनंतर मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलनं सुरु झाली आहेत. अशा प्रकराचे प्रसंग ज्यावेळी येतात, त्यावेळी राज्याचं हीत लक्षात घेतलं पाहिजे. पण काही नेत्यांकडून काही राजकीय पोळी भाजता येते का? राजकीय स्वार्थ साधता येतो का? अशा प्रकारचा प्रयत्न केला जात असल्याचा थेट आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरेंसह कॉंग्रेसवर केला आहे.

Jalna Maratha Protest ‘मी क्षमा मागतो’, फडणवीसांनी लाठीचार्ज प्रकरणी मागितली माफी

मराठा आरक्षण उपसमितीची सह्याद्री अतिथी गृहावर बैठक पार पडली. ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार यांनीही घणाघाती टीका केली.

RRC Apprentice Recruitment 2023 : दहावी पास उमदेवारांसाठी नोकरीची संधी, भारतीय रेल्वेत 2409 पदांची भरती सुरू

खरंतर आजपर्यंत मराठा, मुस्लीम, धनगर, लिंगायत समाज असेल यांच्याकडून आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. या ठिकाणी कोणतेही सरकार असेल तर ते तशा प्रकारच्या मागणीची पूर्तता करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र उद्या तो प्रयत्न झाल्यानंतर कायद्याच्या चौकटीत देखील तो बसला पाहिजे.

हायकोर्टात, सुप्रिम कोर्टात देखील तो मान्य झाला पाहिजे. वेळोवेळी सुप्रिम कोर्ट वेगवेगळे निर्णय देते, वेगवेगळ्या राज्यांसंबंधी असतात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलेलं मराठा आरक्षण हायकोर्टात टिकलं. मात्र सुप्रिम कोर्टात ते पुन्हा नाकारण्यात आलं. त्यानंतर वेळोवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील प्रयत्न करत आहेत.

शेवटी सुप्रिम कोर्टानं मराठा आरक्षण का नाकारलं आहे? याचा अभ्यास करुन त्याच्यावर कमिटी स्थापन करुन बारकाईने अभ्यास करण्यात आला. आज झालेल्या बैठकीत या सर्व बाबींचा उहापोह करण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube