अजित पवारांनी वाहिली मोदींच्या मातोश्रींना श्रद्धांजली

अजित पवारांनी वाहिली मोदींच्या मातोश्रींना श्रद्धांजली

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे निधन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ट्वीट करून याची माहिती दिली. त्यानंतर राजकीय तसेच अन्य सर्वच क्षेत्रातील दिग्गजांकडून मोदींच्या मातोश्रींना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. यातच विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील श्रद्धांजली वाहिली आहे.

“माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री श्रीमती हिराबाबेन मोदी यांचे निधन झाल्याचे समजून दुःख झाले. त्याग, समर्पण, निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास आज संपला. मातृवियोगाचे दुःख मोठे असून ते सहन करण्याची शक्ती पंतप्रधान महोदयांना मिळो.

आम्ही सर्व मा. पंतप्रधान आणि मोदी परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. स्वर्गीय हिराबाबेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.” अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

हिराबेन मोदी यांचा जन्म १८ जून १९२३ रोजी झाला. याच वर्षी त्यांनी वयाची शंभरी ओलांडली होती. याच माहिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या आईची भेट घेतली होती. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचारानिमित्त मोदी गुजरातमध्ये होते तेव्हा त्यांनी आईची भेट घेतली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube