अजितदादांच्या ‘गुलाबी’ जॅकटवरून पॉलिटिक्स; पण रंग नेमका कोणता?; दादांनी उदाहरणासह सांगितलं!

  • Written By: Published:
अजितदादांच्या ‘गुलाबी’ जॅकटवरून पॉलिटिक्स; पण रंग नेमका कोणता?; दादांनी उदाहरणासह सांगितलं!

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीकडून मतदारां आकर्षित करण्यासाठी नव-नवीन योजना आणल्या जात आहेत. तर, दुसरीकडे मतदारांना भेटण्यासाठी अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीकडून जन सन्मान यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेत अजित पवारांसह कार, बस, चॅकेट सर्वकाही गुलाबी रंगात न्हाहून निघालं आहे. मात्र, आता खुद्द अजितदादांनीच ते परिधान करत असलेल्या जॅकेटचा रंग नेमका कोणता याबाबत उदाहरणासह खुलासा केला आहे. जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. (Ajit Pawar Explain His New Jacket Color With Appropriate Example )

‘बारामतीत सुनेत्रा पवारांना उमेदवारी द्यायलाच नको होती’; अजितदादांना चूक अखेर उमगली

काय म्हणाले अजित पवार?

मुलाखतीदरम्यान अजितदादांना चॅकेट घातून कसे वाटतयं स्मार्ट दिसताय तुम्ही असे विचारण्यात आले. त्यावर दादांनी तुम्ही रंग ओळखता याला गुलाबी रंग म्हणू शकता असा प्रतिप्रश्न विचारला. त्यावर समोरील व्यक्तीने याला वाईन कलर म्हणून शकतो. त्यावर आपल्या जॅकेटचा रंग मुळात गुलाबी नसून, हा एक वेगळाच रंग असून त्याचं नावचं कुणाला सांगता येणार नसल्याचे अजित पवार म्हणाले.

अन् उदाहरणासह अजितदादांनीचं सांगून टाकला जॅकेटचा खरा रंग

मग या जॅकेटला आपण गुलबक्षी किंवा वाईन रंग असं म्हणू शकतो असे मुलाखत घेणारी व्यक्ती म्हणाली. त्यावर अजितदादांनी नकार देत एक उदाहरण दिले. अजित पवार म्हणाले की, तुम्हाला खरं सांगू का, आपलं पिकलेलं जांभूळ खाल्यानंतर त्या जांभाळीच्या बीवर ज्या रेघा रेघा असतात त्याचा जो रंग आहे तो या जॅकेटचा मूळ रंग असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

Video : मी संसदेत बोलले की लगेच घरी लव्ह…; नवऱ्याचा उल्लेख करत सुळेंचं मोठं विधान

पवारांनी निळा रंग दाखवत लगावला होता टोला

काल (दि.12) पुण्यात पत्रकार परिषदेत शरद पवारांना (Sharad Pawar) अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी पवारांनी निळ्या रंगाचं उदाहरण देत अजितदादांना टोला लगावला होता. पत्रकार परिषदेला संबोधित करताना एका पत्रकाराने पवारांना गुलाबी जॅकेट, गुलाबी बॅनर, गुलाबी गाडी आणि माहोल गुलाबी करुन ते सध्या लाडकी बहीण योजनेबाबत सर्वत्र जागृती करत आहेत. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना या गुलाबी रंगाचा फायदा होईल का? विधानसभेला महिला वर्ग त्यांच्याकडे आकर्षित होतील का? असा प्रश्न विचारला. त्यावर पवारांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारची फिरकी घेत अजितदादांती विकेट घेतली.

Sanjay Raut: बारामतीतून लाडक्या बहिणी अजित पवारांना पराभूत करतील; संजय राऊतांचा घणाघात

तुमच्याकडे महिला आकर्षित होती का?

अजित पवारांच्या गुलाबी जॅकेट आणि रंगाबाबत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराने निळ्या रंगाचा शर्ट घातला होता. त्याने पवारांना प्रश्न विचारताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या स्टाईलने तुम्ही निळ्या रंगाचा शर्ट घातल्याने तुमच्याकडे महिला आकर्षित होतील का? असा प्रतिप्रश्न विचारला. त्यानंतर मात्र, आता गुलाबी रंगावरून अजितदादांना डिवचणाऱ्या विरोधकांना अजित पवारांनी आपण कोणत्या रंगाचं जॅकेट घालत आहोत हे उदाहरणासह सांगितले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube