मैं उडना चता हू, बस रुकना… अजितदादांच्या अपघाती विमानाच्या पायलटच्या लेकीची भावूक पोस्ट!
Ajit Pawar यांच्या अपघाती विमानाचे पायलट सुमित कपूर यांचा देखील मृत्यू झाला. नुसतच कपूर यांच्या लेकीने एक भावूक पोस्ट लिहिली आहे.
Ajit Pawars crashed plane Pilot Sumit Kapoor Daughters Emotional post : 28 जानेवारीच्या सकाळी राज्यावर एक दु:खद आणि दुर्दैवी बातमी समोर आली होती. ती म्हणजे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले. यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. त्यातील अपघाती विमानाचे पायलट सुमित कपूर यांचा देखील मृत्यू झाला. नुसतच कपूर यांच्या लेकीने एक भावूक पोस्ट लिहिली आहे.
अजितदादांच्या पायलटच्या लेकीची भावूक पोस्ट!
या पोस्टमध्ये कपूर यांच्या मुलीने लिहीले की, पप्पांनी आदरनिय अजित सर आणि इतर राजकीय कलाकार मान्यवरांसोबत अनेकदा विमान प्रवास केला आहे. त्यांना विमानाने नेल आहे. त्यांचं आभाळावरील आणि विमानावरील प्रेम कोणतीही गोष्ट कमी करू शकत नाही. बनी खरचं म्हणत होता की, मैं उडना चाहता हू बस रूकना नही चाहता.
Wipro, TCS, Infosys सह आयटी शेअर्स घसरले, गुंतवणूकदारांना मोठा धक्का; नेमकं कारण काय?
तसेच ती पुढे म्हणाली की, गेल्या पाच वर्षांत मी त्यांना नवनवीन सेलिब्रेटी राजकीय नेत्यांना विमान प्रवास घडवून आणताना पाहिलं. ज्यामध्ये संपूर्ण भारतातील काही मंत्री, इतर मान्यवरांचा समावेश होता. तेव्हा देखील मी त्यांना नेहमी म्हणायचे पप्पा मला तुमचा खूप अभिमान वाटतो. आजही मी तेच म्हणेन की, पप्पा मला तुमचा खूप अभिमान वाटतो आणि कायम वाटत राहिल. मी तुम्हाला खूप मिस करते. सर्वोत्कृष्ट पप्पा. असं म्हणत तीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
