अजितदादांची तक्रार केलीच नाही, सुषमा अंधारेंचं स्पष्टीकरण…

अजितदादांची तक्रार केलीच नाही, सुषमा अंधारेंचं स्पष्टीकरण…

अजितदादांची तक्रार केली नसल्याचं स्पष्टीकरण ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी दिलं आहे. दरम्यान, तक्रार केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुषमा अंधारेंचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यावर आता सुषमा अंधारेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलंय.

शिंदे-फडणवीस सरकार फक्त तीन महिने, जावं तर लागणारच; राऊतांचा घणाघात

सुषमा अंधारे म्हणाल्या, अजितदादा महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते आहेत, अजितदादा तुम्ही आमच्या हक्काचे, जवळचे आहात तुमच्यावर आमचा अधिकार आहे म्हणून आम्ही आपुलकीने बोलतो, पण तुम्ही असं बोलून आम्हाला परकं करु नका, असंही त्या म्हणाल्या आहेत.

मी त्यावेळी ज्या सभागृहाची सदस्या मी नाहीये, त्या सभाृहात विरोधी पक्षनेत्यांनी बोलावं, असं बोलले होते. आता सभागृहात फक्त अजितदादा एकटेच विरोधी पक्षनेते नाहीत. मला सर्वच नेत्यांकडून अपेक्षा आहे, उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडूनही मला अपेक्षा असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

विरोधकांच्या एकजुटीला धक्का, ओडिशाचे मुख्यमंत्री पटनायक वेगळा वळणावर

तसेच मी अजितदादांची तक्रार केली, अशा बातम्या माध्यमांनी प्रसारित केलेल्या आहेत. मुळात अजितदादांची तक्रार मी केलेली नाही. मी बोलले त्यावेळी अजितदादांचा त्यामध्ये उल्लेख केलेला नाही. मी सर्वच नेत्यांना उद्देशून बोलत होते. अजितदादा आमच्या हक्काचे नेते आहेत, तुमच्यावर आमचा अधिकार आहे, त्यामुळे तुम्ही असं बोलून आम्हाला परकं करु नये, असंही त्या म्हणाल्या आहेत.

नैतिकता जपण्यासाठी उद्धव ठाकरेंचा राजीनामा; ‘त्या’ निर्णयावर जितेंद्र आव्हाड म्हणाले…

दरम्यान, सुषमा अंधारे यांनी काही दिवासंपूर्वी सातारा येथे एका कार्यक्रमात बोलताना अजितदादांची तक्रार शरद पवारांकडे केली होती. माझ्यावर अश्लाघ्य भाषेत टीका होते त्यावर विधानसभेत त्यांनी आवाज उठवला नसल्याचे अंधारे म्हणाल्या होत्या. यावेळी शरद पवारांसमोर त्यांना अश्रू अनावर झाले.

त्यावर अजित पवार म्हणाले होते, सुषमा अंधारे या कुठल्या गटात आहेत. सुषमा अंधारे या ठाकरे गटात आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी पवार साहेबांसमोर रडण्यापेक्षा, तिथे भावनिक होण्यापेक्षा त्या ज्या पक्षाचं काम बघत आहे, ज्या पक्षासाठी काकारे, बाबारे, मामारे करत आहे आणि सभा घेत आहे. त्यांनी एवढा अजित पवारांचा उल्लेख करण्यापेक्षा ते ज्या पक्षात आहे त्या पक्षाच्या विरोधी पक्षनेत्याला सांगायला पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी अंधारेंचा समाचार घेतला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube