Akot Election : मोठी बातमी! अकोटमध्ये एमआयएमचे दोन नगरसेवक विजयी

Akot Election : आज राज्यातील 288 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून या निवडणुकीत

  • Written By: Published:
Akot Election

Akot Election : आज राज्यातील 288 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. 288 पैकी 264 नगरपरिषदेसाठी आणि नगरपंचायतीसाठी राज्यात 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती तर 20 डिसेंबर रोजी 24 नगरपरिषदांसाठी आणि नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती.

तर दुसरीकडे या निवडणुकीत एमआयएमने देखील आपलं खातं उघडलं आहे. अकोटमध्ये एमआयएमचे दोन नगरसेवक विजयी झाले आहे तर भाजप सुरुवातीच्या कलनुसार राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. धामणगावमध्ये भाजपचे 6 उमेदवार विजयी झाले आहे. तर भगूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 7 उमेदवार विजयी झाले आहे.

चंद्रपुरमधील भिसी नगरपंचायतीत 4 जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला आहे तर लातूरच्या उदगीरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 उमेदवार विजयी झाल्या आहेत. तर राहत्यात राधाकृष्ण विखे पाटलांचा जलवा…राहता नगरपालिका निवडणुकीत विरोधकांचा धुव्वा…एकहाती सत्ता मिळवली… 20 पैकी भाजपचे 19 नगरसेवकांची विजयाकडे घौडदौड. श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचे करण ससाणे आघाडीवर, भाजपला धक्का; २७०० मतांनी आघाडीवर. नाशिकच्या भगूर नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस विजयी.. प्रेरणा बलकवडे विजयी; शिवसेना शिंदे सेनेच्या पंचवीस वर्षाच्या सत्याला सुरुंग..

 

 

 

 

 

 

 

follow us