Legislative Council Election : महाविकास आघाडीकडून सत्यजित तांबेना.., देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Legislative Council Election : महाविकास आघाडीकडून सत्यजित तांबेना.., देवेंद्र फडणवीसांचा आरोप

मुंबई : महाविकास आघाडीकडून सत्यजित तांबे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप उपमुख्यमंत्री सत्यजित तांबे यांनी केला आहे. अपक्ष निवडणूक लढवूनही ते भरघोस मतांनी विजयी झाल्याने सत्यजित तांबे यांचं फडणवीसांनी अभिनंदन केलंय.

फडणवीस म्हणाले, नाशिक पदवीधरमध्ये महाविकास आघाडीच्या तिनही पक्षांकडून सत्यजित तांबे यांना टार्गेट करण्याच प्रयत्न झाला. तरीही अपक्ष निवडणूक लढवत ते भरघोस मतांनी निवडून आल्याने त्यांचं अभिनंदनही फडणवीसांकडून करण्यात आलंय.

तसेच बऱ्याचा काळानंतर आम्ही कोकणात विजय मिळवला आहे. जी जागा आमच्याकडे नव्हती च्या जागेवर आम्ही विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे नागपूरची जागा आम्ही जिंकलो नाही याचं आम्हांला दुख: असल्याचंही ते म्हणालेत.

खरंतरं आम्ही महाराष्ट्र शिक्षक परिषदेकडे कोकण आणि नागपूरच्या दोन्ही जागा मागितल्या होत्या. मात्र, शिक्षक परिषदेने आम्हांला नागपूरची जागा दिलेली नाही. त्या जागेवर भाजपचा नाहीतर शिक्षक परिषदेचा उमेदवार होता. त्यामुळे आम्ही नागपूरात जिंकू शकलो नाही.

मराठवाड्यातही आमच्या उमेदवाराने चांगली फाईट दिली आहे. तर अमरावती पदवीधर मतदारसंघात आमच्या उमेदवाराला अपेक्षेप्रमाणे मते मिळालेली नाहीत. अद्याप अमरावती मतदारसंघाचे निकाल स्पष्ट झाले नसून तिथे मोठ्या प्रमाणात मते बाद झाली आहेत.

दरम्यान, या बैठकीत पक्षाच्या संघटनेबाबत, मन की बात, परिक्षा पे चर्चा अशा कार्यक्रमांच्या रिव्ह्युबाबत चर्चा झाल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय. तर पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीबाबत देखील चर्चा झाली आहे. दोन्ही मतदारसंघाच्या पोटनिवडणूकही आम्ही जिंकू, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube