लक्षवेधी प्रकरण पुन्हा पेटलं; दानवेंच्या पीएला तहसीलदाराने झापलं, वाचा AटूZ फोनकॉल संवाद

लक्षवेधी प्रकरण पुन्हा पेटलं; दानवेंच्या पीएला तहसीलदाराने झापलं, वाचा AटूZ फोनकॉल संवाद

Ambadas Danve PA Tehsildar Phone Call : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या पीएला तहसीलदार महिलेने चांगलच झापलं आहे. लक्षवेधी आणि तारांकित प्रश्नांचा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. (MLC) विधिमंडळाला पाठवलेला लक्षवेधी प्रश्न त्याचं तहसीलदारांना पाठवल्याचं समोर आलं आहे. (Ambadas Danve ) यावरून तहसीलदार ज्योती देवरे आणि दानवेंच्या पीएचं संभाषण व्हायरलं झालं आहे.

काय आहे संभाषणात?   आता विरोधकांनाही जास्त संधी द्याल; बिर्लांना शुभेच्छा देत राहुल गांधींचीही कडी

तहसीलदार – माझ्या नादी लागलात तर याद राखा. माझी नोकरी गेली उ….त
पत्रकार परिषद घेऊन सर्व जगाला ओरडून सांगणार.
पीए- ऐका ऐका… आम्हाला काही करायचं असतं तर आम्ही करून टाकलं असत ना मॅडम.
तहसीलदार- करा ना काय करायचय ते करा तुम्हाला..काही वाटलं पाहिजे थोडंफार
पीए- आम्ही तुम्हाला सपोर्ट करतोय. तुम्ही असं का करताय?
तहसीलदार- काय सपोर्ट करता? लक्षवेधी लावता. त्याचा ड्राप्ट टाकता मला. मागच्या तुमच्या चुकीच्या लक्षवेधीमुळे माझी मुंबईवरून बदली झाली. त्यावर तुमच्या दानवे साहेबांना सांगितल की मला मुंबईला परत द्या त्यावर त्यांनी मोटे सांहेबांना भेटून मॅडम काही चुकलं नव्हत असं सांगून परत घेतो असं सांगितलं होतं. तुम्ही तर आता परत माझ्या पाठिमागं लागला आहात. आता काय मला एखाद्या डोंगरावरून लोटून देता की काय?
पीए- मॅडम मला सांगा अगोदरचा विषय मला माहिती आहे का? सांगाबर
तहसीलदार – आधीचा विषय त्या फडतरेंना विचारा तो फडतरे कोण
पीए- मी विचारेन. पण तु्म्ही अस हायपर होऊ नका
तहसीलदार – अरे काय हायपर होऊ नका.. माझी काही राहिल का उद्या.. मी राजीनामा देऊन टाकेल उद्या आणि सांगेल यांनी त्रास दिल्यामुळे राजीनामा दिला म्हणून
पीए- हे बघा मॅडम
तहसीलदार- अहो थोडस जरी तुम्हाला काही वाटत की नाही तुम्हालाही बहिण असेल, नोकरी करत असेल, थोडा विचार कराना जरा
पीए- अहो मला सांगा आम्ही तुमचा हे केलाय का
तहसीलदार – केला म्हणजे करायला लागले होते ना, करायला लागले होते ना तुम्ही
पीए- तुम्ही एव्हडच सांगा की पुर्वीचा विषय मला माहिती आहे का काही?
तहसीलदार- दानवे साहेबांना काय माहिती नाही का विषय. दानवे साहेबांकडे हे सप्लायर लोकं गेली. ऐका विष तुम्हाला परत सांगते…

शिंदे गटाची टीका मोठी बातमी : लोकसभा अध्यक्षपदी ओमप्रकाश बिर्लांची पुन्हा निवड; इंडिया  आघाडीची खेळी फेल

यावर शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्या यांची चांगलीच टीका केली आहे. अंबादास दानवे पैशांसाठी लक्षवेधी लावणारी ‘महाराष्ट्राची महुआ मोइत्रा… महिला अधिकाऱ्यायाचा मानसिक छळ करणाऱ्या शिल्लक गटाच्या अंबादास दानवेना विरोधी पक्षनेते पदावर राहण्याचा नैतिक अधिकारच नाही असंही त्या म्हणाल्या आहेत. आडनावातच नाही तर वृत्तीतही ‘दानव’ आहे असा घणाघातही त्यांनी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube