Amol kolhe : शिवनेरीवर भगवा लावण्यास परवानगी मिळणार का ? लोकसभेत सवाल

  • Written By: Published:
Amol kolhe : शिवनेरीवर भगवा लावण्यास परवानगी मिळणार का ? लोकसभेत सवाल

“जे सरकार कलम 370 हटवू शकतं ते सरकार शिवनेरीवर कायमचा भगवा लावण्यास परवानगी देईल का? असा प्रश्न करत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत शिवनेरी गडावरील प्रश्न उपस्थित केला. राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेत ते बोलत होते. पुरातत्व खात्याच्या नियमांमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असणाऱ्या किल्ले शिवनेरीवर कायमस्वरुपी भगवा ध्वज फडकवला जात नाही. याचा मुद्दा त्यांनी लोकसभेत उपस्थित केला.

गोवंश असलेल्या बैलाचा समावेश हा वाघ, सिंह आणि अस्वल यांसारख्या प्राण्यांच्या यादीत आहे. त्यामुळं सरकारने बैलाला नॉन परफॉर्मिंग अॅनिमल्स नियम मधून वगळण्याची मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली.

याशिवाय शिरूर मतदारसंघात केंद्र सरकारनं वन औषधी संशोधन प्रकल्पाची घोषणा केली असून त्याला अद्याप केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळं या प्रकल्पाबाबत सरकारनं तातडीनं सकारात्मक पावलं उचलण्याची गरज असल्याचंही खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेत म्हटलं आहे.

आपल्या भाषणात त्यांनी केंद्र सरकारचे आभारही मानले. डॉ. अमोल कोल्हे यांनी त्याचा उल्लेख करत म्हटले की, माझ्या मतदारसंघात पुणे-नाशिक, पुणे-नगर, पुणे-शिक्रापूर तळेगाव चाकण या महामार्गावर नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक खात्याच्या माध्यमातून 20 हजार कोटींची कामे सुरू आहेत. त्याशिवाय, खासदार अमोल कोल्हे यांनी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांचेही आभार मानले. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला मंजुरी दिली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube