Amol Mitkari : विरोधी पक्षांच्या अमदारांना धमक्या सत्र सुरूच… आता ‘या’ आमदाराला आली धमकी!
Amol Mitkari : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. अगदी तीन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या गटाचे नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांना धमकीचा मेसेज आला आहे. या मेसेजमध्ये ‘राज साहेबांवर बोलताना जपून बोला, अन्यथा तुमचा करेक्ट कार्यक्रम करू, अशी धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून कायदा-सुव्यवस्था आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. मिटकरी यांनी अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
मत नसलेल्या सेनेच्या एका टुकार कार्यकर्त्याने आज मला करेक्ट कार्यक्रम करण्याची धमकी दिली.राज्यातील जात्यांध परिस्थिती पाहता सुरक्षेच्या दृष्टीने मी सिविल लाईन पो. स्टेशन अकोला या ठिकाणी तक्रार गुन्हा दाखल झाला आहे.@CMOMaharashtra @Dev_Fadnavis आरोपीस तात्काळ अटक करावी हि विनंती pic.twitter.com/o4dFyGpbjY
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 1, 2023
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांना ‘व्हाट्सअप’वरून जीवे मारण्याचा धमकीचा मेसेज आला आहे. ‘राज ठाकरे यांच्यावर बोलताना जरा सांभाळून बोला, नाही तर तुमचा करेक्ट कार्यक्रम करणार’, असा धमकीचा मेसेज आला आहे. याबाबत अमोल मिटकरी यांनी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांकडून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणात दखल घेत कारवाई करण्याची मागणी केली आहे. मला ठार मारण्याची धमकीचा मेसेज आला असून माझ्या कुटुंबीयांना आणि मला धोका निर्माण झाला आहे.
Vasant More यांची मध्यस्थी : अन् एका तासात प्रकरण मिटले… – Letsupp
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी स्वतःट्विट करत या धमकीची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. अमोल मिटकरी म्हणतात की, ‘स्वतःच मत नसलेल्या सेनेच्या एका टुकार कार्यकर्त्याने मला करेक्ट कार्यक्रम करण्याची धमकी दिली आहे. सध्या राज्यातील एकूणच परिस्थिती पाहता सुरक्षेच्या दृष्टीने मी अकोला शहरातील सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
(3) Congress on PM Modi | काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर निशाणा | LetsUpp Marathi – YouTube