अनिक्षाची अमृता फडणवीसांना मोठी ऑफर; मुंबई पोलिसांच्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासा

अनिक्षाची अमृता फडणवीसांना मोठी ऑफर; मुंबई पोलिसांच्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासा

Amruta Fadnavis Threat Case : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना खंडणी आणि लाच मागत धमकी दिल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. 793 पानांचे ही चार्जशीट असून यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. बुकी अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) याच्यावरील आरोप मागे घेण्यासाठी अनीक्षा जयसिंघानी (Aniksha Jaisinghani) हीने अमृता फडणवीस यांना एक कोटींची ऑफर दिल्याची माहिती या चार्जशीटमध्ये दिली आहे.

मलबार हिल पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 22 फेब्रुवारीला अमृता फडणवीस यांनी अनिल जयसिंघानीला सांगितलं की जर तुमच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करत अडकवण्यात आलं असेल तर त्या देवेंद्रजींशी बोलून त्यांना मदत करण्याचा दावा त्यांनी केला होता. याबाबत पोलिसांनी त्यांच्या आरोपपत्रात म्हटले आहे. जयसिंघानी याची मुलगी अनिक्षावर गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवसांनी दोघांमध्ये हे संभाषण झाले होते.

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसचा अहमदनगरमध्ये होणारा वर्धापन दिन रद्द : अजित पवार यांची घोषणा

अमृता फडणवीस यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की त्यांची अनिक्षाशी 2021 मध्ये भेट झाली. तेव्हापासून त्या एकमेकींच्या संपर्कात आहेत. अनिक्षाने आपल्याला आई नसल्याचे अमृता यांना सांगितले होते. डिझायनर असल्याचाही दावा तिने केला होता. तिने आपल्या प्रमोशनसाठी अमृता फडणवीस यांना आपले दागिने घालण्याची विनंती केली होती. जी अमृता यांनी मान्य केली.

अमृता फडणवीस यांनी आरोप केला आहे, की अनिक्षा जयसिंघानीने वडिलांच्या मदतीने त्यांना धमकी दिली. त्यांच्याविरोधात कट रचला. त्यानुसार पोलिसांनी अनिक्षा व तिच्या वडिलांविरोधात गु्न्हा दाखल केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube